Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News|बायणा येथील ती हत्या पूर्ववैमनस्यातून केल्याचा प्राथमिक अंदाज

पोलिसांनी पाठलाग करत स्कूटरच्या पुढे गाडी घालून दोघांनाही खाली पाडले व ताब्यात घेत मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमन्तक

वास्को: बायणा वास्को येथे समुद्रकिनारी चौघांनी एकावर प्राणघातक हल्ला करून हत्या केल्याची घटना आज सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. उमेश हरिजन (रा. काटे बायणा) असे मृताचे नाव आहे.

(Brutal killing of youth at Bayana beach)

या प्रकरणी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमीर हुसेन व दीपकसाहनी (दोघे, रा.बायणा-वास्को) यांना पोलिसांनी पाठलाग करून जुने गोवे येथून ताब्यात घेतले. तर दोघे फरार आहेत. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी दुपारी उमेश हा सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन घरी परतत होता. यावेळी वास्को बायणा आईस फॅक्टरी जवळ चौघांनी त्याला अडविले. त्याला एका बाजूला नेऊन त्याच्यावर सर्वप्रथम मागून धारदार शस्त्राने वार केले. नंतर चारही जणांनी त्याच्या अंगावर चाकू व धारदार शस्त्राने हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला. घटना समजताच उमेभच्या भावाने उमेशला गंभीर जखमी अवस्थेत दाबोळी चिखली रुग्णालयात दाखल नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मुरगांव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक, वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या समवेत मुरगाव तालुक्याचे उपअधीक्षक राजेश कुमार घटनास्थळी दाखल झाले. मुरगाव पोलिसांनी खुनासाठी वापरलेले सर्व हत्यारे ताब्यात घेऊन पुढील तपासला सुरवात केली.

फोंडा पोलिसांची कामगिरी

खून प्रकरणातील दोन संशियत फोंड्यात बाणस्तारीच्या दिशेने आल्याची माहिती फोंडा पोलिसांना मिळताच त्यांनी बाणस्तारी येथे नाकाबंदी केली. यावेळी दोन संशयित युवक स्कूटरवरून आले असता, पोलिसांनी त्यांना थांबण्यासाठी इशारा केला. मात्र, ते नाकाबंदी तोडून जुने गोवेच्या दिशेने भरधाव गेले. पोलिसांनी पाठलाग करत स्कूटरच्या पुढे गाडी घालून दोघांनाही खाली पाडले व ताब्यात घेत मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT