Bronwyn Sinari Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात गुंडाराज! जबरदस्ती घरात घुसून कुटुंबीयांना हाकलंल, साहित्य फेकले बाहेर; तीन सुरक्षा रक्षकांना अटक

Bronwyn Sinari Theft Case: हणजूण येथील सेंट मायकलवाडा येथे ब्रॉन्विन सिनारी यांच्या घरात जबरदस्तीने घुसखोरी हाकलून मुद्देमालाची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली होती.

Manish Jadhav

हणजूण येथील सेंट मायकलवाडा येथे ब्रॉन्विन सिनारी यांच्या घरात जबरदस्तीने घुसखोरी करुन हाकलून मुद्देमालाची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणी हणजूण पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एवढचं नाहीतर हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे वर्गही करण्यात आले. शनिवारी (8 फेब्रुवारी) प्रतिबंधक कायद्याखाली या आरोपींना हणजूण पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली.

आरोपी गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश राहा, (रायबरेली, उत्तर प्रदेश) परशुराम गवस ( नादोरा) आणि विक्की नाईक ( जुने गोवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांना धमकी, चोरी आणि जबरदस्तीने घर खाली करण्यासंबंधी हणजूण पोलिसांनी अटक केली. ही तिघेही सुरक्षारक्षक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शनिवारी (8 फेब्रुवारी) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सोमवारी हणजूण पोलिसांनी मुख्य आरोपी (Accused) जनार्दन खोराटेसह अज्ञात 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

पीडित ब्रॉन्विन सिनारी आणि पती राजेंद्र सिनारी हे कॅनडास्थित मायक पीटर या विदेशी नागरिकाच्या मालकीच्या घरात वास्तव्यास होते. मात्र घटनेच्यावेळी या मालमत्तेची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी आपल्याकडे असल्याचा दावा मुख्य आरोपी जनार्दन खोराटे याने सिनारी यांच्या घरात घुसखोरी करत केला होता. एवढच नाहीतर सिनारी कुटुंबीयांना धमकावत खोराटेच्या माणसांनी त्यांच्या घरातील सामान बाहेर फेकून दिले.

दरम्यान, सिनारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपल्या घरातून तब्बल तीन लाखांची चोरी झाल्याचे म्हटले. वॉशिंग मशीन, लॅपटॉप, प्रींटर, सुटकेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरघुती वस्तू चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले.

हणजूण पोलिसांकडून कारवाई

याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भादंवि 189 (2), 191 (2), 329 (4), 305 (4) आणि 190 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्हातर्गंत पोलिसांनी दोन बाऊन्सरना देखील अटक केली होती. मात्र संशयितांची नावे पोलिसांनी उघड केली नाहीत. दुसरीकडे, मुख्य आरोपी असणाऱ्या जनार्दन खोराटेने अटकपूर्व जामीनासाठी कोर्टाचे (Court) दार ठोठावले आहे. शुक्रवारी (14 फेब्रुवारी) त्याच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT