Court Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Trial: डॅनियली मॅक्लॉग्लीनची हत्या करणाऱ्याला काय शिक्षा होणार? लवकरच होणार निवाडा, दोन दिवस चालणार सुनावणी

South Goa Sessions Court Hearing: केवळ गोव्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (२८) खून प्रकरणाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहचला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: केवळ गोव्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ब्रिटिश बॅगपॅकर  डॅनियली  मॅकलॉग्लीन  (२८) खून प्रकरणाचा  खटला आता अंतिम टप्प्यात पोहचला असून, हा खटला लवकरच निकाली लागावा यासाठी न्यायालयाने येत्या १३ व १४ जानेवारीला संपूर्ण दिवस या खटल्याची सुनावणी ठेवली आहे.

दक्षिण गोवा सत्र न्यायालयात हा खटला सुरू असून सध्या अतिरिम  युक्तिवाद सुरू आहे. जलदगतीने या खटल्याची सुनावणी सुरू असल्याने लवकरच त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.  १३ मार्च २०१७ रोजी काणकोणातील (Canacona) राजबाग-आगोंद येथे डॅनियलीचा खून झाला होता. खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. या खुनाचे पडसाद विदेशातही उमटले होते.

काणकोण पोलिसांसाठी (Police) हा खून एक आव्हान बनले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खुनाचा छडा लावून याच तालुक्यातील भगतवाडा  येथील विकट भगत याला अटक  केली होती. त्यावेळी त्याचे  वय २४ वर्षे होते.  विकट व  डॅनियली या दोघांत मैत्री होती. खुनानंतर तिचा मोबाईलही चोरीला गेला होता. तिच्या अंगावर ७ जखमा होत्या. विकटचे  तुरुंगातील वर्तनही  चांगले नाही. त्यामुळे  न्यायालयाने त्याला बेड्या  घालून सुनावणीस आणण्याचा आदेश दिला होता. वडिलांच्या निधनानंतर तो पॅरोलवर सुटला होता.  

जलद सुनावणीची मागणी

काणकोण पोलिसांनी विकटवर  न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून), ३७६ (बलात्कार), ३९४ (जबरी चोरी) व २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) आदी कलमाखाली गुन्हा नोंद आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी सरकार पक्षाच्या  वकिलाने या खटल्याची सुनावणी जलदगतीने करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर या खटल्याचा निकाल  लवकर लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT