Congress Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : ‘वाढत्या महागाईवर नियंत्रण आणा’; काँग्रेस आक्रमक

काँग्रेसकडून म्हापसा बाजारपेठेत ‘महागाईवर चर्चा’ विषयावर जनजागृती करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. शुक्रवारी काँग्रेसकडून म्हापसा बाजारपेठेत ‘महागाईवर चर्चा’ विषयावर जनजागृती करण्यात आली. याशिवाय सरकारने ताबडतोब महागाई नियंत्रणात आणून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत काँग्रेसने भाजप सरकारचा निषेध केला.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, म्हापसा गटाध्यक्ष अ‍ॅड. शशांक नार्वेकर, संजय बर्डे, गुरुदास नाटेकर, वरद म्हार्दोळकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसकडून बाजारपेठेत पत्रके वाटण्यात आली.

अमित पाटकर म्हणाले, गेल्या आठ वर्षांत बेरोजगारीची टक्केवारी चौपट वाढली आहे. अनियोजित जीएसटीमुळे सुमारे 14 कोटी लोकांच्या उदरनिर्वाहावर गदा आली. तसेच 20 ते 26 या वयोगटातील सुमारे 42 टक्के युवक सध्या बेरोजगार आहेत. यावेळी अ‍ॅड. शशांक नार्वेकर संजय बर्डे, वरद म्हार्दोळकर, सुदिन नाईक, सुधीर कांदोळकर, गुरुदास नाटेकर यांनीही मनोगत व्यक्त करीत सरकारवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

SCROLL FOR NEXT