Santa Cruz Bridge Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz: महामार्गावर वाहनांच्या रांगा! सांताक्रूझ हद्दीत पुलाच्या कामामुळे समस्या; बांबोळीकडून येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

Santa Cruz Bridge: सांताक्रूझ व मेरशी पंचायतीच्या हद्दीत खारफुटी जमिनीतील पाण्याचा प्रवाह एकमेकांना जोडणाऱ्या पुलाचे मुख लहान झाल्याने पाण्याच्या प्रवाह कमी झाला.

Sameer Panditrao

पणजी: महामार्गावर सांताक्रूझ पंचायतीच्या हद्दीत खारफुटी जमिनीतील पाण्याच्या प्रवासाठी पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गावर वळविण्यात आल्याने सध्या येथे अधून-मधून वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कुजिरा येथील शाळा सुटल्याने पाल्यांना घेऊन येण्यासाठी आलेल्या पालकांच्या वाहनांची आणि महामार्गावरून करणाऱ्या वाहनांमुळे रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सांताक्रूझ व मेरशी पंचायतीच्या हद्दीत खारफुटी जमिनीतील पाण्याचा प्रवाह एकमेकांना जोडणाऱ्या पुलाचे मुख लहान झाल्याने पाण्याच्या प्रवाह कमी झाला आणि तेथील खारफुटी सुकून गेल्या. त्यामुळे सध्या महामार्गाच्या खालून दोन्ही बाजूचा पाण्याचा प्रवाह जोडण्याचे काम सुरू आहे.

त्यासाठी पुलाची निर्मिती केली जात असून, एका मार्गावर सध्या खोदकाम करून तळाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काँक्रिटीकरण झाल्यानंतर स्लॅब टाकला जाणार आहे. एका टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम केले जाईल.

बांबोळीकडून येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

यापूर्वी बायपास मार्गाखालील पुलाच्या टप्प्याचे काम पूर्ण केले झाले आहे. त्यामुळे बांबोळीकडून पणजीकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करता येतो. जी वाहने बांबोळीकडून सांताक्रूझ उड्डाण पुलावरून पुढे येतात, त्यांच्यासाठी एकेरी मार्गाचा वापर करावा लागत आहे, खोदकाम केलेल्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर दुभाजक हटवून वाहने वळविण्यात आली आहेत. एकाच मार्गावरून ये-जा करणारी वाहने असल्याने काही अंतरासाठी दररोज याठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT