Breast Cancer Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer Epidemic in Goa: चिंता वाढली! गोव्यात स्तन कर्करोगांच्या संख्येत यंदा सर्वाधिक वाढ; बदलती जीवनशैली, उशिरा विवाह मुख्य कारणे

Goa Grapples with Rising Breast Cancer Cases: बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तन कर्करोग हा आजार बळावत आहे. गेल्या पाच वर्षात यंदा म्हणजे 2024 मध्ये गोव्यात सर्वाधिक म्हणजे 169 रुग्णांची नोंद झाली आहे.

Manish Jadhav

पणजी: बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तन कर्करोग हा आजार बळावत आहे. गेल्या पाच वर्षात यंदा म्हणजे 2024 मध्ये गोव्यात सर्वाधिक म्हणजे 169 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. शहरातील मुली उशिरा लग्‍न करतात. त्यामुळे स्तनपानही उशिरा होतो. त्याचाही परिणाम स्तन कर्करोग रुग्णांच्या संख्येवर होत असल्याचा दावा गोवा वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. सिडनी पल्हा यांनी केला आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाने गेल्या सहा वर्षांतील स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असल्याची नोंद केली आहे. 2019 मध्ये 106 रुग्ण होते. त्यानंतर 2020 मध्ये 67 आणि 2021 मध्ये 45 अशी घट झाली होती. 2024 मध्ये पुन्हा वाढ होत ही संख्या 169 वर पोहोचली.

यासंदर्भात, पल्हा म्हणाले की, मुली स्थिरस्थावर होण्याची कारणे देऊन उशिरा लग्न करत असल्याने त्यांचे पहिले मूल हे 30 वर्षानंतर जन्माला येते आणि त्यांचे स्तनपानही योग्य प्रकारे होत नाही. अशा मुलींना स्तन कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

यासंदर्भात, जागृतीची गरज आहे. त्यामुळेच रुग्णांना लवकर ओळखणे, प्रतिबंध करणे आणि त्यांना मदत करणे, यावर लक्ष केंद्रित करुन गोवा सरकार जनजागृती करीत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग रुग्णालय देखील सुरु करण्यात आले आहे.

स्पष्ट बोलण्याची गरज!

डॉ. सिडनी म्हणाले, स्तन कर्करोगसंबंधी जागरूकता होत असते. मात्र महिला याविषयी खुलेपणाने बोलत नाहीत. त्यांना होत असलेला त्रास जाणून घेण्यासाठी त्यांनी स्पष्ट बोलण्याची गरज असते. आजही महिला बोलण्यास घाबरत असल्याने डॉक्टरांना उपचार करण्यास त्रास होतो. उपचारपद्धती ही शेवटी रुग्णांनी दिलेल्या माहितीवर आणि चाचण्यांवर ठरते.

24 तास सेवा!

डॉ. सिडनी म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता कर्करोग रुग्णालय सुरु केले आहे. या रुग्णालयात महत्त्वाची आणि आवश्‍यक चाचणी केल्‍या जातात. त्‍यासाठी इतर ठिकाणी जावे लागत नाही. स्‍तन कर्करोगावर देखील रुग्णालयात उपचार होतात. प्रामुख्याने सांगायचे झाले तर 24 तास स्तन कर्करोगतज्ञ रुग्णालय उपलब्ध असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT