Dainik Gomantak
गोवा

Goa News: शाळांमध्ये सायबर क्राईम बचाव प्रशिक्षण आणि गोव्यातील ठळक बातम्या

Marathi News 16 January 2025: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी मराठीमध्ये

Akshata Chhatre

शाळकरी मुलांनी गिरवले सायबर क्राईमपासून बचावाचे धडे

गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडून प्रशिक्षित शिक्षकांनी गोव्यातील शाळांमध्ये जनजागृती सत्र आयोजित केले.

गिरीश चोडणकरांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

उच्च न्यायालयाने गिरीश चोडणकर यांच्याकडून सभापतींच्या निवाड्याबाबत दिलेली याचिका फेटाळून लावली आहे.

शरद काळे यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती

डॉ.शरद काळे, माजी शास्त्रज्ञ भाभा अणुसंशोधन केंद्र यांची मुख्यमंत्री सावंत यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आणि गोवा स्वतंत्र राज्य बनले...

1967 मध्ये गोव्याला महाराष्ट्रात समाविष्ट करणे किंवा स्वतंत्र ठेवणे यावर एक मतदारसंघ झाला होता. त्यावेळी 81.70% लोक मतदानाला उपस्थित झाले होते. यामध्ये 54.20% लोकांनी गोव्याला स्वतंत्र ठेवण्यास समर्थन दिले, तर 43.50% लोकांनी गोव्याला महाराष्ट्राशी एकत्रित करण्यास समर्थन केले.

ईशांत सावंत यांची मुख्यमंत्री सावंत यांच्या ओएसडीपदी नियुक्ती

गोवा नागरी सेवेचे वरिष्ठ अधिकारी एशांत सावंत यांची मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डिचोली नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी होणार निवडणूक

नगराध्यक्ष निवडणूक जाहीर. डिचोली पालिकेच्या रिक्त नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी (ता. 22) रोजी होणार निवडणूक. पुंडलिक (कुंदन) फळारी यांनी दिलेला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर.

1.02 किलो गांजासह एकास रंगेहात पकडले

क्राईम ब्रँचने घुरीये येथील मैदानाजवळ छापा टाकून मोहम्मद रेहान (२८, बंगळुरू) याला १.०२ किलो गांजासह ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

संजीवनी साखर कारखान्या समोरील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून एकाचा जागीच मृत्यू. तर एक जण गंभीर जखमी.

डिचोली नगराध्यक्षाच्या निवडीसाठी २२ जानेवारी रोजी नगरसेवकांसोबत बैठक

डिचोली नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्षाच्या निवडीसाठी २२ जानेवारी रोजी सर्व नगरसेवकांसोबत होणार विशेष बैठक.

पर्ये भुमिका देवस्थानाच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्त कायम

पर्ये भुमिका देवस्थानाच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्त कायम. पर्येतील भूमिका देवीच्या कालोत्सवावरून बुधवारी (१४ जानेवारी) सकाळी दोन गटांमध्ये वाद उद्भवला. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

SCROLL FOR NEXT