Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोवा आणि भाजप सरकारची बदनामी करणाऱ्या Toolkit चे मूळ शोधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Goa Cabinet Meeting: सरकारी नोकरीची पदे भरण्याची प्रक्रिया थांबणार नाही. पुढील दोन महिने ती सुरूच राहील.

Pramod Yadav

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटन आणि भाजप सरकारवर सोशल मिडिया आणि माध्यमांतून टीका होत आहे. गोवा मंत्रिमंडळाच्या बुधवारी (०८ जानेवारी) झालेल्या बैठकीत पर्यटन क्षेत्राविषयी चर्चा करण्यात आली. 'टूलकिट'द्वारे गोव्याविषयी बाहेरील राज्यांत बदनामी केली जात आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. ह्या 'टूलकिट'चे मूळ शोधले गेले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

देश पातळीवरील एका पत्रकाराने गोवा आणि सरकारच्या बदनामीसाठी 'टूलकिट' कार्यरत असल्याचा दावा केला होता. याबाबत पत्रकाराने एक्स या समाजमाध्यमावर याबाबत खुलासा केला होता.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोव्याची आणि सरकारची बदनामी करणाऱ्या 'पेड एन्फ्लूएन्सर' ना कोणाचा पाठिंबा आहे, हे शोधून काढले पाहिजे, असे मत मंत्र्यांनी मांडले.

बाहेरच्यांसोबत काही आतले लोक त्यांना फूस देत आहेत का, याची चौकशी व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. पर्यटन आढाव्यासाठी सर्वसमावेशक बैठक घेण्याचे ठरले.

सरकारी नोकरीची पदे भरण्याची प्रक्रिया थांबणार नाही. पुढील दोन महिने ती सुरूच राहील. परंतु पात्र ठरणाऱ्यांची नेमणूक एप्रिलनंतर होईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कित्येक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

वित्त खात्यातर्फे नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात खर्च कपातीसंदर्भात खात्यांना सूचना होत्या. त्यासोबत नवीन पदे निर्माण करू नये, असाही उल्लेख होता. त्यामुळे नोकरभरती प्रक्रिया खोळंबणार हे स्पष्ट होते.

परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात स्पष्टपणे खुलासा केला आहे. पर्वरी सचिवालयात आज मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पोलिस खात्यात ६, खाण खात्यामध्ये १५, उपसंचालकांची २ कंत्राटी पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पशुपालन व पशुसंवर्धन महाविद्यालय प्राचार्यपदी डी. आंतोनियो यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT