Usgaon Ponda, Goa Dainik Gomantak
गोवा

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

Ponda News: तिने विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि दर्शनविषयी विचारणा केली तेव्हा या विद्यार्थ्यांनी तो वाहून गेल्याचे सांगितले.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: उसगाव-साईनगर येथे बुधवारी (ता.१६) ओहळात वाहून गेलेला दर्शन संतोष नार्वेकर (११) याचा मृतदेह गुरुवारी दूधसागर नदीत तरंगताना आढळला. अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर आपल्या जवानांसमवेत पाण्यात शोध घेत असताना त्यांना मृतदेह सापडला.

बुधवारी सायंकाळी तिस्क येथे ट्युशनसाठी गेलेला दर्शन आपल्या विद्यार्थी मित्रांसमवेत घरी आडवाटेने परतत होता. यावेळी वाटेतील ओहळ ओलांडताना अकस्मात ओहळात पाणी वाढल्याने विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली.

एकमेकांच्या हातात हात धरून ओहळ ओलांडताना त्याचा हात सुटून तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. तसेच त्याच्याबरोबर असलेले अन्य विद्यार्थीही पाण्याच्या झोतात वाहत होते. इतक्यात त्या ठिकाणी दर्शनची मोठी बहीण पोहोचली. तिने या विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि दर्शनविषयी विचारणा केली तेव्हा या विद्यार्थ्यांनी तो वाहून गेल्याचे सांगितले.

त्यानंतर याची माहिती पोलिसांना व अग्निशामक दलाला देण्यात आली. नंतर अग्निशामक दल व पोलिसांनी स्थानिकांना बरोबर घेऊन संपूर्ण ओहळात रात्री दोन वाजेपर्यंत शोध घेतला.

गुरुवारी सकाळी अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी बोटीच्या साहाय्याने दूधसागर- खांडेपार नदीत पुन्हा शोध सुरू केला असता दहा मिनिटांच्या आत त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.

शववाहिकेची वानवा

फोंडा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला व शवचिकित्सा करण्यासाठी मडगाव येथील हॉस्पिसियो येथे पाठवण्यात आला. अधिक तपास फोंडा पोलिस करीत आहेत. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शववाहिका लवकर न मिळाल्याने शेवटी फोंडा येथील राजेश वेरेकर यांच्या शववाहिकेने शवचिकित्सेसाठी मृतदेह पाठण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT