Boycott of goa Panchayat Elections in canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोणमध्ये पंचायत निवडणूकीवर बहिष्कार

पैंगीण पंचायतीच्या मार्ली-तिर्वाळ वार्डातील काळशी,चिपळे,खरेगाळ,बादेगाळ,तिर्वण वाड्यावरील मतदार मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करताना.

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैंगीण पंचायतीच्या मार्ली- तिर्वाळ वार्डातील काळशी,चिपळे वाड्यावरील मतदार पंचायत निवडणूकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर ठाम आहेत असे येथील रहिवाशांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. सलग चार वेळा हा वार्ड अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवून येथील सर्वसाधारण व अन्य मागासवर्गीय इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे.

(Boycott of goa Panchayat Elections in canacona)

या भागातील वीज,पाणी व अन्य समस्या गेली वीस वर्षे निकालात काढण्यात आल्या नाहीत.पाणी पुरवठ्यासाठी 2002 मध्ये जलवाहिनी घालण्यात आली होती मात्र त्या जलवाहिनीतून अद्याप या भागाला पाणी पुरवठा करण्यात आला नाही.या भागाचे पंचायतीत प्रतिनिधित्व करतात त्यांनी कधीच या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले नसल्याचे या भागाचे माजी पंच सुरेंद्र गोसावी यांनी सांगितले.

पैंगीण पंचायतीच्या ग्रामसभेत वेळोवेळी या भागाचे प्रश्न मांडण्यात आले मात्र या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंचाने त्याचा कधीच पाठपुरावा केला नाही.त्यासाठी मार्ली तिर्वाळ वार्डातून चिपळे,काळशी,तिर्वण,खरेगाळ,बादेगाळ हे वाडे वेगळे काढून स्वतंत्र वार्डाची निर्मीती करण्याची मागणी खरेगाळ येथील एक मतदार प्रदीप बंदे यांनी केली.

या पांच वाड्यात 378 मतदार असून मार्ली- तिर्वाळ या दोन वाड्यावर फक्त 240 मतदार आहेत.काणकोणचे आमदार सभापती रमेश तवडकर यांनी बहिष्कार मागे घेण्याची सूचना केली तरी वार्डाचे विभाजन करण्याची मागणी मान्य झाल्याशिवाय बहिष्कार मागे न घेण्याच्या माणीवर ठाम असल्याचे यावेळी उपस्थित मतदारांनी सांगितले.जोपर्यत ही मागणी मान्य होत नाही तो पर्यत लोकसभा व प्रत्येक निवडणूकीवर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचे उपस्थित मतदारांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT