Revolutionary Goans Party Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans Party: भाजप, काँग्रेस हे पक्ष गोव्यासाठी घातक

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans Party कर्नाटकात भाजप तसेच काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हादईचे पाणी कर्नाटकाला मिळवून देणार असल्याचे म्हटले आहे. गोव्याचे अस्तित्त्व संपवू पाहणाऱ्या, म्हादईचे पाणी परतवू पाहणाऱ्या या पक्षाच्या प्रचाराला गोव्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व इतर नेते जातात ही गोमंतभूमीशी गद्दारी आहे, असा घणाघात रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍सचे (आरजी) नेते मनोज परब यांनी केला. पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार वीरेश बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

म्हादई नदीला आई संबोधणारे मुख्यमंत्री गोमंतकीयांच्या तोंडचे पाणी पळविण्यासाठी गोव्याची जीवनदायिनी पळवू पाहणाऱ्यांचा प्रचार करत आहेत. सत्तरीवासीय म्हादईला दैवत मानतात. परंतु तेथील नेतेही प्रचारात व्यस्त आहेत.

भाजपने म्हादईबाबत कर्नाटकशी डील केले आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष गोव्यासाठी घातक आहेत. या पक्षांचे नेत आपल्या राष्‍ट्रीय नेत्यांच्या मर्जीबाहेर नसल्याचे परब म्‍हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोव्यात सभा झाली, त्यावेळी त्यांनी म्हादईप्रश्‍नी एकही शब्द काढला नाही. उलट कर्नाटकच्या जाहीरनाम्यात कळसा-भांडुराचे पाणी वळविण्याची घोषणा केली आहे.

विधानसभेत ज्यावेळी म्हादईवर चर्चा झाली, त्यावेळी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास व्यक्त केला. गोव्यातील जनता पाण्यासाठी अक्षरक्षः तळमळत आहे. मात्र सरकारला काहीच पडलेले नाही. जनतेने त्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे, असे आवाहन आमदार वीरेश बोरकर यांनी केले.

भाजप-काँग्रेस एकाच माळेचे मणी

कळसा -भांडुरा प्रकल्प उभारण्यास व म्हादई नदीचे पाणी वळविण्यास भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार आहेत. गोव्यातील जनतेला खोटे सांगून झाले, आता ते कर्नाटकातील जनतेलाही खोटे सांगत आहेत.

आणखी काही दिवसांनी गोव्यात पाण्याची टंचाई जाणवेल. उत्तर गोव्यातील सखल भागात पाणी मिळत नाही. विहिरी आटल्या आहेत. साखळी व वाळपई भागातही तीच परिस्थिती आहे.

मात्र दोन्ही स्‍थानिक आमदार कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचारात गुंतलेले आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा घाट घातलेल्या गोव्‍यातील भाजप सरकारने आता जनतेच्या पैशांवर घेतलेल्या 140 हून अधिक कदंब बसेस कर्नाटकात भाजपच्या रॅलीसाठी पाठविल्या आहेत. गोव्यात वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असताना अशा प्रकारे कदंब बसेस घेऊन जाणे कितपत योग्य आहे?

- मनोज परब, ‘आरजी’चे नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT