Bori  Dainik Gomantak
गोवा

Bori Rain : बोरीत झाडे पडून घर जमीनदोस्त; सतरकर कुटुंब झाले बेघर

गोमन्तक डिजिटल टीम

Bori Rain :

बोरी, अडूळशे बोरी येथील हुमणो उर्फ सिध्देश सतरकर यांच्या घरावर वादळीवाऱ्यामुळे आंब्याचे झाड आणि माड पडून घर पूर्ण पणे जमीनदोस्त झाल्याने या पावसाळ्यात हुमणो सतरकर कुटुंबीयांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

तर हुमणो सतरकरासह त्यांच्या कुटुंबातील व्‍यक्ती वेळीच घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र, कौले पडून जबर मार लागल्याने दोन मुली व स्वतः हुमणो हे जखमी झाले.

गुरूवार २३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास वळवाच्या पावसाने जोर धरला त्यातच वादळीवारा सुटला. सतरकर यांच्या घराशेजारी सुमारे २५ मीटर अंतरावर असलेले जुने आंब्याचे झाड मोडून पडत असल्याचे हुमणो सतरकर यांच्या लक्षात आले.

कामावरून परतून ते घरात जात असताना संभाव्य धोका ओळखून त्यांनी पत्नी व मुलांना घरातून बाहेर येण्यासाठी ओरड केली छोटी मुले घराबाहेर पडत असतानाच आंब्याचे झाड घरावर पडले व तसेच शेजारचा एक माडही घरावर पडून घर जमीनदोस्त झाले.

घरावर झाडे पडल्याची खबर फोंडा अग्निशामन दलाला देताच अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन रात्री हे झाड तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु याच वेळी वीज खंडित झाल्याने अंधारात त्यांना झाड कापून काढता आले नाही. शुक्रवारी, सकाळी या घरावरील झाड तोडून काढण्यास जवानांना यश आले.

दरम्यान, या घराचे पूर्ण नुकसान झाल्याने हुमणो सतरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने त्यांचे घर पुन्हा उभारण्यासाठी मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तलाठ्यांकडून पंचनामा

या नैसर्गिक आपत्तीचा तलाठी सुशया वेळीप यांनी पचंनामा केला. माजी सरपंच मनुराय नाईक, पंचायत सदस्य भावना नाईक यांनी घटनास्थळी येऊन हुमणो कुटुंबीयांना धीर दिला. रात्री जखमींना फोंड्याच्या आयडी इस्पितळात नेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना पाठवण्यात आले.

अन् अनर्थ टळला

आंब्याचे झाड घरावर पडताना हुमणो यांच्या डोक्याला जबर मार बसून ते जमिनीवर कोसळले. तसेच त्यांची कन्या सलोनी व उर्वशी यांच्या डोक्यावर कौले पडून ती जखमी झाली. यात एक मुलगी पूर्वीच घराबाहेर पडल्याने ती वाचली. आंब्याचे झाड आणि माड घरावर मोडून पडत होते, तेव्हाच हुमणो घरी पोचल्याने मोठा अनर्थ टळला.

मंत्री शिरोडकरांकडून सहकार्य

दरम्यान शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या घटनेची नोंद घेऊन हुमणो सतरकर यांना स्वतः अर्थसाह्य देण्याचे ठरवून धीर दिला आहे.

निवडणूक आचारसंहितेनंतर शासनातर्फे आर्थिक मदत देऊन हुमणो यांचे उद्‍ध्वस्त झालेले घर पुन्हा उभारणार असल्याचे सांगितले. शनिवार, २५ रोजी हुमणो याला स्वतः मार्फत सहकार्य देण्यासाठी त्यांनी बोलावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

SCROLL FOR NEXT