Goa News
Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: किनाऱ्यावर बोअरवेल, सोकपिट; खंडपीठाकडून प्रशासनाची खरडपट्टी

दैनिक गोमन्तक

Goa News: कळंगुटसह कांदोळी समुद्रकिनाऱ्यांवरील वाळूत शॅकधारकांनी अवैध बोअरवेल (विंधनविहिरी) आणि सोकपिट (सांडपाणीचा खड्डा) तयार केले आहेत. याकडे दुर्लक्ष केल्याने गोवा खंडपीठाने काल प्रशासनाची खरडपट्टी काढली.

ते बोअरवेल, सोकपीट सील करून त्याचा कृती अहवाल 22 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देत या कामात पुन्हा हलगर्जीपणा झाल्यास पर्यटन खात्याच्या सचिव व मुख्य सचिवांना न्यायालयात हजर करू, असा इशारा न्यायालयाने दिला.

कळंगुट, कांदोळी किनारपट्टीवरील वाळूच्या खाली काही शॅकधारकांनी बोअरवेल खोदून त्याला प्लास्टिक पाईप्स जोडले आहेत. काहींनी खोदकाम करून या वाळूखाली सांडपाण्याच्या टाक्या बनविल्या आहेत.

यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत असल्याची जनहित याचिका कांदोळीतील रेवबेन फ्रांको यांनी दाखल केली होती. यासंदर्भातची काही छायाचित्रेही त्यांनी जोडली होती. खंडपीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले होते.

आज ही याचिका सुनावणीस आली असता काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर पाईप्स दिसल्याची माहिती पर्यटन अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे खंडपीठाने अधिकाऱ्याला धारेवर धरत असा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही.

तुम्ही दररोज प्रत्यक्ष शहानिशा करा. जर अधिकारी दौऱ्यावर जाणार असतील व तपासणीच्या कामात गलथानपणा दिसून आल्यास खात्याच्या सचिवांना किंवा मुख्य सचिवांना न्यायालयात उभे करू, असे निर्देश यावेळी खंडपीठाने दिले.

शॅकधारकांचे परवाने रद्द!

कळंगुट, कांदोळीतील हा प्रकार गंभीर असून पर्यावरण तसेच सीआरझेड संवेदनशील क्षेत्राला घातक आहे. पर्यटन खात्याने संबंधित शॅकधारकांना 17 फेब्रुवारीपर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे परवाने का रद्द केले जाऊ नये?

यासाठी उत्तर देण्यास एक आठवड्याचा वेळ द्यावा, पर्यटन खात्याने त्याचा कृती अहवाल सादर करावा, असे खंडपीठाने बजावले आहे.

याचिकेत काय म्हटले?

कांदोळी किनारपट्टीवरील वाळूत अनेक ठिकाणी प्लास्टिकचे पाईप दिसतात. पाईपचा मोटरपंपद्वारे पाणी खेचण्यासाठी वापर होतो. काही ठिकाणी सांडपाणी वाळूखाली असलेल्या टाक्यांमध्ये सोडण्यासाठीही पाईप्सचा उपयोग होत असल्याचा आरोप याचिकेत केला होता.

यावर पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून तेथे काही असे प्रकार नसल्याचे उत्तर दिले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी किनारपट्टीवर जाऊन तपासणी केली आहे की नाही? हा प्रश्‍न उपस्थित केला होता व काल ही सुनावणी ठेवली होती.

अधिकाऱ्यांनी काही प्लास्टिक पाईप्स आढळून आल्याचे सांगितल्याने त्याची खंडपीठाने खरडपट्टी काढली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

SCROLL FOR NEXT