Bordem News Dainik Gomantak
गोवा

Bordem: 'हा आमच्या जीवाशी खेळ'! बोर्डे-डिचोलीत गटारात टाकली जलवाहिनी; संतप्त नागरिकांनी काम पाडले बंद Video

Bordem Bicholim: डिचोली शहरातील बोर्डे भागात चक्क गटारात जलवाहिनी टाकण्याचा प्रकार घडला असून, या प्रकारामुळे स्थानिक संतप्त बनले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली शहरातील बोर्डे भागात चक्क गटारात जलवाहिनी टाकण्याचा प्रकार घडला असून, या प्रकारामुळे स्थानिक संतप्त बनले आहेत. संतप्त बनलेल्या काही जागृत नागरिकांनी गटारातून जलवाहिनी टाकण्यास विरोध करीत बुधवारी (ता.७) सकाळी जलवाहिनीचे काम तूर्त बंद पाडले. गटारात घातलेली जलवाहिनी काढा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बोर्डे भागात सध्या नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोर्डे येथील चव्हाटा भागात रस्ता फोडून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हे काम करताना नियोजन करण्यात आलेले नाही. चव्हाटा येथील पिंपळाजवळ तर चक्क गटारात जलवाहिनी टाकून ती गटारातच जोडण्यात आली आहे.

हा प्रकार काही जागृत नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी सकाळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारीत जलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले. या प्रकारानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यावेळी स्थानिकांनी त्यांनाही जाब विचारीत गटारात घालण्यात आलेली जलवाहिनी काढून ती गटाराबाहेरून घालावी, अशी मागणी केली.

...तर रोगराईला आमंत्रण

गटारातून जलवाहिनी टाकणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळ आहे. या जलवाहिनीतून बोर्डे भागात घाणयुक्त दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जनतेला दूषित पाणी वापरावे लागणार असून, भयानक रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही, अशी भीती कृष्णा पळ यांच्यासह विजय बोर्डेकर आदी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गटारात टाकण्यात आलेली जलवाहिनी काढून ती दुसऱ्या बाजूने घालण्यासाठी संबंधित खात्याने तयारी केल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT