Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: 'आईचे दागिने करायचे आहेत' म्हणत आला, हातोड्याने केला हल्ला; मडगाव प्रकरणातील संशयित बोलत होता कोकणी

BordaMargao Jeweler Attack: सध्या सीसीटीव्ही फुटेजवर कैद झालेल्या संशयिताच्या छबीवरून पोलिसांनी तपासकामाला सुरवात केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती.

Sameer Panditrao

मडगाव: बड्डे-मडगाव येथील साेहन रायकर या सराफावर प्राणघातक हल्ला करणारा तो हल्लेखोर अस्‍खलित कोकणी बोलत असल्याने तो स्थानिक असल्याच्या ठाम निष्कर्षापर्यंत पोलिस  पोहोचले  आहेत.

सध्या सीसीटीव्ही  फुटेजवर  कैद  झालेल्या संशयिताच्या  छबीवरून पोलिसांनी तपासकामाला  सुरवात केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. त्याला आता दोन दिवस लोटले तरीही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे शहरातील  व्यावसायिकही धास्तावले आहेत.

 मंगळवार, २२  जुलै रोजी सायं. ६.३० वा.च्या दरम्यान बड्डे येथील रायकर यांच्या मालकीच्या देवराय इंदिरा ज्‍युवेलर्स या  दुकानात हल्ल्याची  ही खळबळजनक  घटना घडली  होती. एक व्यक्ती या दुकानात आला होता. त्याने आपला चेहरा मास्कने झाकला होता, त्याच्या हातात एक बॅगही  होती.

आपल्या आईचे दागिने नवीन करायचे असल्याचे सांगून त्‍याने रायकर यांना चक्रावण्‍याचा प्रयत्‍न केला होता. पोलिसांच्‍या दाव्‍याप्रमाणे संशयिताचे एकूण वागणे संशयास्पद होते. काही कळण्याच्या अगोदर त्याने सोहन यांच्यावर हातोड्याने वार केला होता. हल्ल्यात थोडक्यात तो किरकोळ दुखापतीवर बचावला होता. संशयिताकडे   एक चाकू होता. तो त्याने तेथेच टाकून नंतर पळ काढला होता.

 घटनेची माहिती मिळाल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकांनाही बोलावून घेण्यात आले होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ती वर्दळीची जागा आहे. मंगळवारी मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळीही  त्या सराफी दुकानाच्या बाहेर लोकांची वर्दळ होती. सध्या पोलिस त्यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांकडूनही अधिक माहिती जाणून घेत आहेत.  या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचनेही  सुरू केला आहे.

नेमके कारण गुलदस्‍त्‍यात!

फातोर्डा पोलिसांनी तपासासाठी दोन पथक तयार केले आहेत. पोलिस संशयिताचे मोबाईल लोकेशनही  पडताळून पाहत  आहेत. हा हल्ला का झाला हे अजूनही गुलदस्‍त्‍यात आहे. संशयित पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतरच  या हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस निरीक्षक नेथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देविदास पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT