Bondla Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Bondla Wildlife Sanctuary: वन्यजीव प्रेमींसाठी गुड न्यूज! बोंडल्याच्या जंगलात लवकरच गुंजणार अस्वलांची डरकाळी अन् हरणांची सळसळ; नवीन वर्षाची 'धमाका' भेट

New Year Wildlife Gift: राज्‍यातील एकमेव बोंडला येथील प्राणी संग्रहालयात नव्‍या वर्षात फेब्रुवारीमध्‍ये अस्‍वल, हरीण आणि कटांदराच्‍या जोड्या पुणे (महाराष्‍ट्र) आणि छत्तीसगड येथून येणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यातील एकमेव बोंडला येथील प्राणी संग्रहालयात नव्‍या वर्षात फेब्रुवारीमध्‍ये अस्‍वल, हरीण आणि कटांदराच्‍या जोड्या पुणे (महाराष्‍ट्र) आणि छत्तीसगड येथून येणार आहेत. तर त्‍या बदल्‍यात गोव्‍यातून गवे, कोल्‍ह्यांच्‍या जोड्या संबंधित राज्‍यातील प्राणी संग्रहालयांमध्‍ये पाठवण्‍यात येणार आहेत.

वन खात्‍याचे अधिकारी विलास गावस यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ‘‘बोंडला प्राणी संग्रहालयात नव्‍या प्राण्‍यांची भर घालून देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना प्राणी संग्रहालयाकडे अधिकाधिक आकर्षित करण्‍याचा निर्णय खात्‍याने काही महिन्‍यांपूर्वी घेतला होता. त्‍यानुसार महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड या राज्‍यांतून अस्‍वल आणि हरणाच्‍या जोड्या आणण्‍याचे निश्‍चित झाले असून, त्‍यासंदर्भातील प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

सोबतच कटांदराची जोडीही आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. राज्‍यातील एकमेव बोंडला येथील प्राणी संग्रहालयात नव्‍या वर्षात फेब्रुवारीमध्‍ये अस्‍वल, हरीण आणि कटांदराच्‍या जोड्या पुणे (Pune) (महाराष्‍ट्र) आणि छत्तीसगड येथून येणार आहेत. तर त्‍या बदल्‍यात गोव्‍यातून गवे, कोल्‍ह्यांच्‍या जोड्या संबंधित राज्‍यातील प्राणी संग्रहालयांमध्‍ये पाठवण्‍यात येणार आहेत.

वन खात्‍याचे अधिकारी विलास गावस यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ‘‘बोंडला प्राणी संग्रहालयात नव्‍या प्राण्‍यांची भर घालून देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना प्राणी संग्रहालयाकडे अधिकाधिक आकर्षित करण्‍याचा निर्णय खात्‍याने काही महिन्‍यांपूर्वी घेतला होता. त्‍यानुसार महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड या राज्‍यांतून अस्‍वल आणि हरणाच्‍या जोड्या आणण्‍याचे निश्‍चित झाले असून, त्‍यासंदर्भातील प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. सोबतच कटांदराची जोडीही आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

एका राज्‍यातून दुसऱ्या राज्‍यात प्राण्‍यांना हलवताना त्‍यांच्‍यासाठी पिंजरे तयार करावे लागतात. गोव्‍याकडूनही असे पिंजरे तयार करण्‍याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका राज्‍यातून प्राणी आणल्‍यानंतर त्‍या बदल्‍यात गोव्‍यात ज्‍या प्राण्‍यांची संख्‍या जास्त आहे, ते प्राणी संबंधित राज्‍याला द्यावे लागतात. त्‍यानुसार महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड या राज्‍यांना गोव्‍यातून गवे आणि कोल्‍हे देण्‍याचेही निश्‍चित झाले आहे, असे विलास गावस म्हणाले.

दरमहा साडेतीन लाखांचा महसूल

१.बोंडला हे राज्‍यातील एकमेव प्राणी संग्रहालय असल्‍यामुळे येथे येणारे पर्यटक (Tourists) प्राणी संग्रहालयास भेट देतात.

२. त्‍यामुळे पर्यटन हंगामात राज्‍य सरकारला दरमहा तीन ते साडेतीन लाखांचा महसूल मिळतो.

३. गेल्‍या काही महिन्‍यांत संग्रहालयात पर्यटकांसाठी आवश्‍‍यक दर्जेदार सोयीसुविधा उभारल्‍या आहेत. त्‍यामुळे पर्यटकांची संख्‍याही वाढत आहे.

४. नवनवे प्राणी आणल्‍यानंतर सरकारला मिळणाऱ्या महसुलात आणखी वाढ होईल, असा विश्‍‍वासही गावस यांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कदंब साम्राज्याचा रक्तरंजित अंत! 52 जहाजांचा ताफा अन् राजपुत्राचा विश्वासघात; गोव्याच्या इतिहासातील 'ती' काळी रात्र

गोव्यात नववर्षासाठी 'तगडा' बंदोबस्त! अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांची करडी नजर; पणजीतील विद्यार्थी सांभाळणार वाहतुकीची धुरा

आपण नक्की कोण? गोमंतकीयांच्या आदिम मुळांचा आणि 'कुर' समुदायाचा रंजक शोध; मिथकांच्या आड दडलेला गोवा निर्मितीचा इतिहास

Goa Live News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आयएनएस हंसावर 'गार्ड ऑफ ऑनर'

Panaji Vehicle Theft Case: गुन्हेगारी इतिहास नाही, मग कोठडी कशाला? वाहन चोरी प्रकरणात वकिलांचा जोरदार युक्तिवाद; 19 वर्षीय जेडन-गौरक्षला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT