Bondla Sanctuary Dainik Gomantak
गोवा

बोंडला अभयारण्याला मिळाली नवी झळाळी

भगवान महावीर अभयारण्याच्या शेजारी बोंडला वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

पणजी: जंगली प्राण्यांवर उपचार केंद्र म्हणून सुरू झालेल्या केंद्राचे आता बोंडला अभयारण्य अधिक प्राणी संग्रहालयात रूपांतरीत झाले आहे. येथे बिबट्यासह सांबर, गवे, चितळे यांच्यासह अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार, वनविभागाने आता यात मोठे बदल केले असून, वाघासह (Tiger) इतर प्राणी आणि पक्षी आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक ए. जेबेस्टीन आणि बोंडला प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक परेश परोब यांनी दिली. (Bondla Wildlife Sanctuary)

Bondla Sanctuary main gate

भगवान महावीर अभयारण्याच्या शेजारी बोंडला वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे अभयारण्य वन्य प्राण्यांचे (Animals) नैसर्गिक अधिवास असलेले प्राणी संग्रहालय आहे. आठ किलोमीटर परिसरात पसरलेला हा भूभाग म्हणजे पर्यटकांची पर्वणी असलेले अभयारण्य होय. सर्वसाधारणपणे पर्यटकांना (Tourists) जंगली प्राणी, पक्षी दृष्टीस पडत नाहीत त्यामुळे नैसर्गिक अधिवासात हे प्राणी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेता घेता या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना सुखावते. इथे सांबर, चितळ, चौसिंगा, काळवीट, अस्वल, रानडुक्कर, पानगेंडा, लांडगा, कोल्हा या प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात ठेवण्यात आले आहे. याबरोबर सापांच्या अनेक जाती तिथे पाहायला मिळतात. त्यात किंग कोब्रा, अजगर, नाग, धामण, फुरसे, तस्कर, मन्यार, घोणस यांच्यासह मगर सुसर हे उभयचर नैसर्गिक पद्धतीने ठेवण्यात आले आहेत.

Bondla Sanctuary

वाघासह कोल्हे, रानकुत्री, अस्वल येणार

बोंडला (Bondla) प्राणी संग्रहालयात पूर्वी वाघ होता. अलीकडे 2008 साली आणलेल्या राणा-संध्या या वाघाच्या जोडीपैकी राणाचा 2018 साली मृत्यू झाला. त्यानंतर या संग्रहालयाला वाघाची प्रतीक्षा आहे. यासंबंधीची बोलणी सुरू असून लवकरच बोंडला प्राणी संग्रहालयात वाघाचे दर्शन पर्यटकांना होणार आहे.

असे बंधन

राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आता देशभरातल्या प्राणी संग्रहालयांवर विविध प्रकारचे निर्बंध आणले आहेत. त्यामुळे प्राण्यांना ठेवताना नैसर्गिक अधिवासात ठेवण्याचे बंधन आहे. त्याचे पालन बोंडला अभयारण्यात आहे. त्यामुळे प्राण्यांची निकोप वाढ होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT