High Court Bombay  Daiinik Gomantak
गोवा

Bombay High Court : अवैध बांधकाम प्रकरणी ; नेरूल पंचायतीला खंडपीठाची नोटीस

आदेशात हे बांधकाम पाडण्याचे निर्देश प्रतिवादी असलेल्या सरकार, मुख्य नगर नियोजक तसेच नेरूल पंचायत सचिवांना दिले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, बार्देश तालुक्यातील नेरूल गावातील सर्वे क्रमांक ८७/१ मध्ये मनोरमा साळगावकर यांनी केलेले बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश देऊनही त्याची कार्यवाही न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस का बजावू नये,

अशी विचारणा करत मुख्य शहर नियोजक तसेच नेरूल पंचायतीला नोटीस बजावली आहे. साळगावकर यांना ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश देऊन राफेल डॉमनिक पेट्रोसिओ यांच्या अवमान याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या ९ ऑक्टोबरला ठेवली आहे.

राफेल डॉमनिक पेट्रोसिओ यांनी मनोरमा साळगावकर यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान याचिका सादर केली होती.

न्यायालयाने ३१ जुलै रोजी दिलेल्या आदेशात हे बांधकाम पाडण्याचे निर्देश प्रतिवादी असलेल्या सरकार, मुख्य नगर नियोजक तसेच नेरूल पंचायत सचिवांना दिले होते.

या आदेशाला साळगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिकेद्वारे आव्हान दिले होते ती ९ ऑगस्ट रोजी फेटाळली होती. या आदेशानंतर प्रतिवाद्यांनी कोणतीच पावले उचलली नाहीत.

त्यामुळे राफेल पेट्रोसिओ यांनी उच्च न्यायालयात सरकारी यंत्रणेविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी अवमान याचिका सादर केली आहे. न्यायालयाने प्रतिवाद्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.

दिरंगाई आढळल्यास गय नाही !

उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश देऊनही ते पाडण्यात आलेले नाही. या बांधकामाविरुद्ध नेरूल पंचायत सचिवांनीही कारवाईसाठी कोणतीच पावले उचलली नाहीत. या पुढील सुनावणीपर्यंत संबंधित प्रतिवाद्यांनी आवश्‍यक ती पावले उचलावीत.

ही कारवाई करण्यास जाणूनबुजून उशीर करण्यात आला का, याबाबतही न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे निरीक्षण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT