High Court Of Bombay At Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा सरकारला मोठा धक्का! कलम 17 (2) खाली क्षेत्रबदलाचे नियम व मार्गदर्शक तत्वे रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश

Major Setback For Goa Government: स्थगिती असेपर्यंत दुरुस्ती कलम १७(२) खाली क्षेत्र बदलासाठीच्या अर्जाना मंजुरी न देण्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: टीसीपी दुरुस्ती कलम १७ (२) खाली क्षेत्रबदल करण्यासाठीचे नियम व मार्गदर्शक तत्वे रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी आज (१३ मार्च) दिला.

या आदेशामुळे सरकारसह ज्या संस्था व व्यक्तींना क्षेत्रबदलासाठी मंजुरी देण्यात आली होती, त्यांना दणका बसला आहे. या आदेशाला सरकारने सहा आठवडे स्थगिती देण्याची विनंती केल्यावर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे; मात्र ही स्थगिती असेपर्यंत दुरुस्ती कलम १७(२) खाली क्षेत्र बदलासाठीच्या अर्जाना मंजुरी न देण्याचे स्पष्ट केले आहे.

'जनतेसाठी ही सुवार्ता आहे. कारण, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जागेनुसार बदलल्या जाणाऱ्या क्षेत्रबदलाला विरोध केला होता, ज्यामुळे गोव्याच्या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट बदलला जाणार होता आणि प्रादेशिक आराखडा २०२१ला अक्षरशः बाजूला ठेवले होते, जो अजूनही वैध आहे आणि गोव्याच्या लोकांसाठी फायदेशार आहे.
अॅड. नॉर्मा आल्वारिस, याचिकादारांच्या वकील

तूर्त 'जैसे थे' स्थिती

१) गोवा खंडपीठाने टीसीपी १ कायद्यातील दुरुस्ती कलम १७ (२) रद्द केले नसले तरी त्याखालील नियम व मार्गदर्शक तत्वे रद्द केल्याने आतापर्यंत ज्यांना मंजुरी दिली आहे त्याना या आदेशाची अंमलबजावणी करताना सुरु असलेले काम 'जैसे थे' ठेवावे लागणार आहे.

२) राज्य सरकारने प्रादेशिक २ आराखडा २०२१ मधील विसंगतीच्या नावाखाली राज्यातील अनेक भागातील जमिनींचे कलम १७ (२) खाली क्षेत्रबदलासाठी अधिसूचना जारी केल्या होत्या.

सुमारे ३०० हून अधिक अर्जाना मंजुरी देताना सुमारे २६ लाख चौ. मी. जमिनींचे क्षेत्रबदल आत्तापर्यंत करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

गोवा फाऊंडेशनसह तीन पर्यावरण संघटनांनी २०२३ मध्ये टीसीपी कायद्यात १७ (२) दुरुस्ती करण्याची अधिसूचना जारी केल्यानंतर त्याला जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेऊन टीसीपी कायद्यातील दुरुस्ती १७ (२) नुसार क्षेत्रबदलासाठी दिलेली मंजुरी ही याचिकेवरील निर्णयावर अवलंबून असैल, असे स्पष्ट केले होते.

याचिकेत २४ मंजुरी दिलेल्या अधिसूचनांचा समावेश करण्यात आला होता. कलम १७(२) खाली क्षेत्रबदलासाठी येणारा कोणताही प्रस्ताव केवळ प्रादेशिक आराखड्यात राहिलेल्या विसंगतीवर आधारीत निर्णय घेता येणार नाही तर त्या असलेल्या त्रुटी विचारात घेऊन त्याची कारणेही निर्णय घेताना द्यावी लागतील. प्रत्येक प्रकरण वेगवेगळे असल्याने त्यावर वेगळी सुनावणी घेण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

Cooch Behar Trophy: गोव्याची विजयी घोडदौड! मिहीर कुडाळकरच्या फिरकीच्या जाळ्यात आसामचे फलंदाज अडकले; दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 215 धावांनी दिली मात

Solar Village Goa: सौर पॅनल बसवा 1 कोटी मिळवा! 'पीएम सूर्यघर' योजनेतून गोव्याला खास भेट; प्रत्येक जिल्ह्यात 'आदर्श सौर गाव' निर्माण करण्याचा निर्णय

Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

SCROLL FOR NEXT