Shel Melauli IIT Protest Dainik Gomantak
गोवा

IIT Protest Case: आयआयटीविरोधात हिंसक आंदोलन! RG च्या नेत्यांना कोर्टाचा मोठा दिलासा, परबांसह दोघांवरील गुन्हा रद्द

IIT Protest: रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) मनोज परब व रोहन कळंगुटक यांच्याविरोधातचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : शेळ-मेळावली येथे आयआयटीविरोधात झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) मनोज परब व रोहन कळंगुटक यांच्याविरोधातचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला. त्यामुळे या दोघांनाही दिलासा मिळाला आहे.

या गुन्ह्यात तेथील स्थानिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील आणखी काहींनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव घेतलेली आहे, त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

हे आंदोलन सकाळपासून सुरू झाले होते तेव्हा हिंसक प्रकार घडला होता तर अर्जदार मनोज परब व रोहन कळंगुटकर हे संध्याकाळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यास आले होते.

त्यांचा या हिंसक आंदोलनाशी काहीच संबंध नसताना ते त्यावेळी उपस्थित राहिले म्हणून दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

त्यामुळे त्यांच्याविरुद्धचा गुन्हा रद्द करावा अशी बाजू आमदार तथा ज्येष्ठ वकील कार्लोस फेरेरा यांनी मांडली होती. सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी त्याला विरोध केला. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. महेश सोनक यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT