Goa News: देशात इंट्रीग्रेटेड वैद्यकीय अभ्यासक्रमाची आवश्यकता: राज्यपाल आर्लेकर; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Today's Live News Update: शिगमोत्सव, पर्यटन हंगाम, राजकारण, गुन्हे, क्रीडा - कला - संस्कृती यासह गोव्याच्या विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa News: देशात इंट्रीग्रेटेड वैद्यकीय अभ्यासक्रमाची आवश्यकता: राज्यपाल आर्लेकर; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

"देशात इंट्रीग्रेटेड वैद्यकीय अभ्यासक्रमाची आवश्यकता": राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल- केरळ

देशात इंट्रीग्रेटेड वैद्यकीय अभ्यासक्रमाची आवश्यकता. केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे मत. डिचोलीच्या दीनदयाळ हॉस्पिटलला दिली भेट.

"गोव्यातील खाणकाम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल" केंद्रीय खाण मंत्री जी. किशन रेड्डी

केंद्रीय खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जाहीर केले आहे की, गोव्यातील खाणकाम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल. ही घोषणा राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. हा कालावधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विधानाशी सुसंगत आहे, ज्यात त्यांनी सांगितले होते की, लीज लिलाव प्रक्रिया पाच महिन्यांत पूर्ण केली जाईल आणि खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू होईल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय खाण मंत्रालय आणि गोवा सरकार यांच्यातील संयुक्त बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक केंद्रीय मंत्री श्री. जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

मा. मुख्यमंत्री यांनी माहिती दिली की, या बैठकीत खालील विषयांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला:

•⁠ ⁠राज्यातील संभाव्य खाण ब्लॉक्सच्या लिलावाच्या योजनेवर, तसेच नॉन-ऑपरेशनल खाणींच्या पुनरुज्जीवनासाठीच्या लिलाव योजनेवर, कालबाह्य झालेल्या व कालमर्यादा संपलेल्या लीज (MMDR कायद्यातील कलम 10A2 अंतर्गत) संदर्भात चर्चा झाली.

•⁠ ⁠लिलाव झालेल्या खाणींच्या कार्यान्वयनाच्या स्थितीबाबत, सुरू असलेल्या अन्वेषण प्रकल्पांबाबत तसेच GSI, MECL, राज्य अन्वेषण संस्था, NPEAs यांसारख्या संस्थांमार्फत होणाऱ्या अन्वेषण प्रकल्पांबाबत चर्चा झाली.

मा. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील खाण व्यवसायाच्या पुनरुज्जीवनामुळे अर्थव्यवस्था बळकट होत आहे आणि GSDP मध्ये योगदान वाढत आहे. तसेच, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि केंद्रीय खाण मंत्रालयाने दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; समाजसेवक राम कणकोणकर याच्याविरोधात गुन्हा दाखल, अटकेची मागणी

धार्मिक गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी महाराज यांच्याविरोधात समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून समाजसेवक राम कणकोणकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या अनुयायांनी बुधवारी रात्री उशिरा पणजी पोलीस ठाण्याबाहेर जमा होऊन कणकोणकर यांच्या अटकेची मागणी केली.

"गोवा केंद्र सरकारच्या खाण संशोधनाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देईल" मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा केंद्र सरकारच्या खाण संशोधनाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देईल. अशा उपक्रमांमुळे गोव्याला मोठा लाभ होईल आणि खाण क्षेत्राच्या सखोल अन्वेषणासाठी गोवा अशा योजनेचे मनःपूर्वक स्वागत करतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डोना पावलामध्ये अन्वेषण परवाना ब्लॉक्सच्या पहिल्या टप्प्याच्या लिलावाच्या उद्घाटनावेळी सांगितले.

Goa Politics: "मडकईकर यांचे विधान खोटे" अरुण सिंह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस

माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांचे भ्रष्टाचार आणि लाचखोरीबाबतचे विधान पूर्णपणे खोटे होते. सरकार आपले काम प्रामाणिकपणे आणि योग्यरित्या करत आहे हे लोकांना माहिती आहे: अरुण सिंह, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस

Goa News: उच्च न्यायालयाचा सरकारला दणका, टीसीपीचे कलम 17 (2) चे नियम आणि मार्गदर्शक तत्वे रद्द!

उच्च न्यायालयाचा सरकारला दणका. टीसीपी खात्याचे वादग्रस्त कलम 17 (2) चे नियम आणि मार्गदर्शक तत्वे रद्द. पुढील 6 आठवडे कलम 17(2) ला स्थगिती. हा लोकांचा विजय - नॉर्मा आल्वारीस,याचिकादार

Dayananda Money Scheme:...तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या 'अशा' लाभार्थ्यांचे पैसे होणार बंद!

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी अजून आपल्या बॅंक खात्याशी आधारकार्ड लींक केलेल नाही त्यांनी ते त्वरीत करावे. त्यासाठी ३० एप्रिल ही अंतीम तारीख आहे‌. ह्यापुढे ही मुदत वाढवली जाणार नाही.तसेच समाज कल्याण खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बॅंक खात्याशी आधारकार्ड लींक असणे आवश्यक. खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांची माहिती.

Blast In Cuncolim: भूमीगत केबलिंग करताना कुंकळ्ळीत ब्लास्ट; एक कामगार गंभीर जखमी

भूमीगत केबलिंग करताना कुंकळ्ळीत ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. यात एक कामागार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वेलडिंग करताना हा ब्लास्ट झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी कामगाराला सुरुवातीला बाळ्ळी रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले आहे.

Goa Mining: मुळगाव खाणप्रश्नी आजची बैठक रद्द!  

केंद्रिय मंत्री जी. किशन रेड्डी हे गोव्यात आल्याने बैठक रद्द करण्याचा निर्णय. आज सायंकाळी 5 वा. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होती संयुक्त बैठक.

Mapusa Crime: 18 वर्षीय मुलीचा पाठलाग; म्हापसा पोलिसांकडून मध्य प्रदेशातील व्यक्तीला अटक

18 वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी मध्य प्रदेशातील व्यक्तीला अटक केली आहे. प्रदीप पांडे ( रा. मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयिताने १८ वर्षीय मुलीचा म्हापसा मार्केट परिसरात पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com