bombay high court goa bench Dainik Gomantak
गोवा

Panaji Lake Fish Death: न्यायालयाचा चाबूक! मळा तलावातील मासे मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल, महापालिकेची लपवाछपवी थांबवा; सांडपाण्याचे नकाशे द्या, कोर्टाचे निर्देश

bombay high court goa bench suo motto: मळा परिसरातील सांडपाणी व मलजल व्यवस्थापनाचे नकाशे पणजी महापालिकेने सादर करावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: येथील मळा तलावातील हजारो मासे मृतावस्थेत आढळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेत सुनावणी सुरू केली आहे. मळा परिसरातील सांडपाणी व मलजल व्यवस्थापनाचे नकाशे पणजी महापालिकेने सादर करावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत तलावात सांडपाणी सोडले जात आहे का, याचा शोध घेण्यासाठी नकाशे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणी विविध सरकारी विभाग व प्राधिकरणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयासमोर माशांच्या मृत्यूमागील वैज्ञानिक कारणे मांडताना तलावातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी ०.८ मिलिग्रॅम प्रतिलिटरपर्यंत घसरल्याचे सांगितले. माशांच्या अस्तित्वासाठी ही पातळी किमान ३ मिलिग्रॅम प्रतिलिटर असणे आवश्यक असते. त्यामुळे ऑक्सिजनअभावी मासे मृत्युमुखी पडल्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर जलस्रोत विभागाने तलावाचे पाण्याचे दरवाजे उघडल्याने ऑक्सिजनची पातळी वाढून ११.८३ मिलिग्रॅम प्रतिलिटर झाली आहे. पाण्याचे नवीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यांचा अहवाल लवकरच न्यायालयासमोर सादर केला जाईल, असेही पांगम यांनी सांगितले.

पुढील सुनावणी सोमवारी

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

ऑक्सिजन कमी होण्याची संभाव्य कारणे

दीर्घकाळ पाणी साचून राहणे

साचलेली घाण, दूषित घटकांमुळे प्रदूषण

तलावात सांडपाणी सोडले जाण्याची शक्यता

इतर कारणांचाही तपास सुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

SCROLL FOR NEXT