Bombay High Court  Dainik Gomantak
गोवा

कायद्यापुढे सरकारलाही ‘सूट’ नाही! सरकारी खात्यांच्या संथ कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे; 714 दिवसांच्या विलंबानंतरचे अपिल फेटाळले 

Bombay High Court Goa bench PWD news: सरकारी विभागांमधील संथ कारभारावर ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपील फेटाळून लावले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सरकारी विभागांमधील संथ कारभारावर ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपील फेटाळून लावले आहे. जमीन संपादनाच्या मोबदल्याविरोधात अपील दाखल करण्यास खात्याकडून झालेला तब्बल ७१४ दिवसांचा अभूतपूर्व विलंबास क्षमा करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. न्या. डॉ. नीला गोखले आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने हा आदेश जारी केला.

रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात फोंडा (Ponda) येथील जिल्हा न्यायधीशांनी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्णय दिला होता. कनिष्ठ न्यायालयाने मूळचा प्रति चौरस मीटर २५ ते ८० रुपये असलेला अत्यंत कमी मोबदला वाढवून ६७५ रुपये प्रति चौरस मीटर केला होता. या वाढीव मोबदल्याला आव्हान देण्यासाठी खात्याच्या कार्यकारी अभियंत्याने ७ जानेवारी २०२६ रोजी प्रथम अपील दाखल केले. मात्र, कायदेशीर मुदत २४ जानेवारी २०२४ रोजीच संपली होती.

लालफितशाहीचा युक्तिवाद अमान्य

या ७१४ दिवसांच्या विलंबाचे समर्थन करताना सरकारने फाईलच्या प्रशासकीय प्रवासाचे कारण दिले होते. सरकारचा हा युक्तिवाद फेटाळताना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक न्यायनिर्णयांचा दाखला दिला. न्यायालयाने नमूद केले की सरकारी विभाग आहे म्हणून त्यांना वेळेच्या मर्यादेत विशेष सवलत किंवा अमर्याद वेळ मिळू शकत नाही. कायदेशीर मुदतीची पूर्ण कल्पना असणारे अधिकारी केवळ ‘प्रशासकीय प्रक्रिया’ आणि ‘लालफितीचा कारभार’ याचे ढाल म्हणून समर्थन करू शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT