Court  Dainik Gomantak
गोवा

Merces Panchayat:...तरीही खारफुटी क्षेत्रात बांधकामे सुरु; हायकोर्टाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट देण्याचे निर्देश

Bombay High Court: खंडपीठाने जीसीझेडएमए, मेरशी पंचायत व तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात गुरुवारपर्यंत (५ सप्टेंबर) माहिती देण्याचे तोंडी निर्देश दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

मेरशी पंचायतीमधील मुर्डा, मोरंबी ओ पिकेन, रेनावडी व मोरंबी ओ ग्रँडे या गावातील खाजन जमिनी, मिठागरे तसेच खारफुटीच्या कत्तलप्रकरणी या भागात बांधकाम करण्यास स्थगिती दिली असताना या परिसरात काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याची माहिती याचिकादाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आज निदर्शनास आणून दिली. खंडपीठाने जीसीझेडएमए, मेरशी पंचायत व तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात गुरुवारपर्यंत (५ सप्टेंबर) माहिती देण्याचे तोंडी निर्देश दिले.

मेरशी पंचायत क्षेत्रातील खारफुटींची कत्तल होऊनही पर्यावरण कायद्यानुसार सरकारने कारवाई न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेतली होती. या चारही गावांमधील मॅपिंग व सर्व्हे चौकशी करण्यासाठी त्वरित कृती दल स्थापन करून या सर्व्हेचा अंतरिम अहवाल तीन आठवड्यांनी सादर करावा. खंडपीठाच्या पुढील आदेशापर्यंत मेरशी पंचायतीमध्ये कोणत्याही खात्याने नव्याने परवाने व ना हरकत दाखले देऊ नयेत. जर तेथे बांधकाम सुरू असल्यास ते त्वरित बंद करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. मात्र, काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्याने यासंदर्भातची माहिती देण्यास उपजिल्हाधिकारी, जीसीझेडएम व पंचायतीला निर्देश दिले आहेत.

छायाचित्रांद्वारे माहिती

काशिनाथ शेट्ये व इतर ८ जणांनी मेरशी पंचायत क्षेत्रातील खाजन जमिनी, मिठागरे व खारफुटींची कत्तल करून मोठ्या प्रमाणात तेथे भराव टाकण्यात आल्याची जनहित याचिका २०१८ साली दाखल केली आहे. याचिकादाराने यासंदर्भातची माहिती खंडपीठाला छायाचित्रांद्वारे सादर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT