Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Goa News: मागील शुक्रवारी अत्यंत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे कार्यालयाचा ताबा सोपवून सगळेचजण गणेश चतुर्थीसाठी मूळ गावी तळ ठोकून होते.
Public services disrupted in Goa | Government office work delay Goa
Goa government employees news
Published on
Updated on

पणजी: राज्य सरकारचे प्रशासन अद्याप गणेश चतुर्थीच्या मूडमधून बाहेर आलेले नाही. बहुतांश सरकारी कार्यालयांतील कर्मचारी अजूनही रजेवर असल्याचे दिसतात. त्यामुळे अनंत चतुर्दशीनंतरच सरकारी यंत्रणेला जनतेची कामे करण्यासाठी जाग येईल अशी चिन्हे आहेत.

राज्यभरातील अनेक शाळांना मागच्या मंगळवारपासून आज मंगळवारपर्यंत (०२ ऑगस्ट) सुट्टी दिली होती. दीड व पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर गणेश चतुर्थीनंतर लोक कामावर परतणे अपेक्षित होते. मात्र शुक्रवारी ईदनिमित्त सुट्टी आहे. त्याला जोडून शनिवार व रविवार आहे.

Public services disrupted in Goa | Government office work delay Goa
Panaji Ashtami fair earnings: पणजी पालिका मालामाल! अष्टमीच्या फेरीतून विक्रमी 1.15 कोटींची कमाई, विनापरवाना 5 अतिरिक्त दिवस सुरु होती फेरी

त्यामुळे सोमवार, मंगळवार बुधवार व गुरुवार अशी चार दिवस सुट्टी घेतली तर मुलांसोबत आठवडाभराची सुट्टी अनुभवता येईल असा हिशेब करत अनेकांनी राज्याबाहेर जाणे पसंत केले आहे.

सरकारी कार्यालयांतही तुरळक उपस्थिती दिसत आहे. त्यातही असलेले कर्मचारी जवळपास गणपती असलेल्या घरांत जेवणासाठी जात दोनेक तास तेथेच काढत असल्याने 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही म्हण सध्या प्रत्यक्षात येताना दिसत आहे.

Public services disrupted in Goa | Government office work delay Goa
Maratha Reservation: सरकार एक तासांत GR काढणार; जरांगेच्या उपोषणाला मोठे यश! हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार

आजारपणाची सबब पुढे

ज्यांना रितसर रजा मिळणे शक्य नव्हते त्यानी आजारपणाचे कारण पुढे केले आहे. गेल्या बुधवारी व गुरुवारी गणेश चतुर्थीची सरकारी सुट्टी होती. म्हणून अनेकांनी शुक्रवारची सुट्टी घेत सलग पाच दिवस सुट्टीचा आनंद घेतला.

मागील शुक्रवारी अत्यंत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे कार्यालयाचा ताबा सोपवून सगळेचजण गणेश चतुर्थीसाठी मूळ गावी तळ ठोकून होते. ते सोमवारी परत येतील असे वाटल्याने काही लोक कामानिमित्त सरकारी कार्यालयांत आले, मात्र अद्याप बहुतांश कर्मचारी कार्यालयांत फिरकलेच नसल्याचे त्यांना दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com