New Zuari bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: झुआरी पुल खुला होताच 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केला पुलावरून प्रवास

आज दुपारी नवीन झुआरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Pramod Yadav

उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित असलेल्या झुआरी केबलस्टेड पुलाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते भव्य आतषबाजीत लोकार्पण झाले. आज दुपारी नवीन झुआरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर पहिल्यांदाच या पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचं पोलीस आणि प्रशासनाकडून स्वागत करण्यात आलं. याचवेळी पुलावरून एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने देखील प्रवास केला.

Satish Kaushik

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते सतिश कौशिक सध्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आहेत. नवा झुआरी पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर पुलावरून पहिल्यांदा प्रवास करण्याची संधी त्यांना मिळाली. यावेळी त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा हा पुल पणजीपासून सुमारे 15 कि.मी अंतरावर आहे.

दरम्यान, झुआरी पूल उद्घाटनानंतरही सुरु करण्यात न आल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला होता. सकाळपासूनच पणजी-मडगाव मार्गावर वाहनांच्या पुन्हा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

2,530 कोटींच्या भव्य प्रकल्पातील मुख्य टॉवरवर रिव्हॅलविंग रेस्टॉरंट आणि व्हीविंग गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधी यापूर्वी दोनदा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी आता केंद्र व राज्य सरकार काही पैशांची गुंतवणूक करून हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

Reis Magos: रेईश-मागूश ग्रामसभेत राडा! महिला सरपंचांसह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

Mandovi River: मांडवी नदीचे पात्र प्रदूषितच! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अखेर उच्च न्यायालयात सादर

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

SCROLL FOR NEXT