Imran Khan Dainik Gomantak
गोवा

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Imran Khan Comeback: वीर दास दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटातून इम्रान खान तब्बल नऊ वर्षांनंतर अभिनयाच्या दुनियेत पुन्हा एन्ट्री करणार आहे.

Pramod Yadav

Imran Khan Comeback After Nine Years

आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने 'जाने तू या जाने' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इम्रानने त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच इंडस्ट्रीवर दबदबा निर्माण केला होता. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर इम्रान खानची जादू लोकांवर चालली नाही आणि त्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला.

आता नऊ वर्षांनंतर इम्रान खान अभिनयाच्या दुनियेत पुन्हा एन्ट्री करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास करत आहेत.

'हॅप्पी पटेल' असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाद्वारे वीर दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे.

इम्रान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता इम्रानच्या पुनरागमनाची माहिती मिळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

पीपिंग मूनच्या वृत्तानुसार, इम्रान खानने गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. इम्रानसोबत या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

वृत्तानुसार मोना सिंग या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मोनाने यापूर्वीही आमिर खानच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने लाल सिंग चड्ढा, 3 इडियट्समध्ये काम केले आहे.

इम्रान खान कमबॅक करत असलेल्या चित्रपटाचे नाव 'हॅप्पी पटेल' आहे . या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे आमिर खानही यात एक कॅमिओ करणार आहेत. हॅप्पी पटेलबद्दल सांगायचे तर हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला जात आहे.

हॅप्पी पटेलनंतर इम्रान खान लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे.

विविध माध्यातील वृत्तांनुसार इम्रान खान सध्या लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. दोघेही करण जोहरच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत, असे माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बुमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूवर पांड्या फिदा; जेमिसनला बोल्ड केल्यावर काय घडलं? सोशल मीडियावर हार्दिकचा हटके अंदाज व्हायरल!

शौर्याला सलाम!! गोव्याच्या दोन सुपुत्रांना सर्वोच्च 'परम विशिष्ट सेवा पदक'; 77व्या प्रजासत्ताक दिनी गोमंतकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

Mollem: "आम्हाला मनःस्ताप सहन करावा लागतोय"! मोले ग्रामस्थ ‘पार्सेकर फुड्स’विरुद्ध आक्रमक; बंदीची केली मागणी

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल पाहिजेच कशाला'? Social Media वर रंगली चर्चा; चिंबलवासियांच्या लढ्यावरती नेटकरी झाले व्यक्त

गोमंतकीय रंगभूमीवरील कलाकारांचा सार्थ अभिमान! वर्षा उसगावकरांचे प्रतिपादन; वळवईत ललितप्रभा नाट्य मंडळाची 105 वर्षपूर्ती

SCROLL FOR NEXT