Nirajsingh Rathod arrested  Dainik Gomantak
गोवा

Nirajsingh Rathod: मंत्रिपदासाठी बोगस ऑफर, तोतया ‘पीए’ला अटक

आमदार आर्लेकरांकडे पैशांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Nirajsingh Rathod भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय साहाय्यक असल्याचे सांगून भाजपच्याच आमदारांना मंत्रिपदाची बोगस ऑफर देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.

त्‍यात पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह महाराष्ट्रातील चौघे आणि नागालँडच्या एका आमदाराचा समावेश आहे. आर्लेकर वगळता तीन आमदारांकडून तोतया ‘पीए’ नीरजसिंग राठोड याने पैसे घेतल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील’,  असे सांगून नीरजसिंह याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी या प्रकरणी तोतया पीएला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंह राठोड हा टाइल्स विक्रेता असून त्याने एकट्याने हे केले की यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे त्याने सहाही आमदारांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली असताना त्यापैकी तीन आमदारांनी त्याला पैसे दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: जागतिक पटलावर 'मोदी' मॅजिक कायम! न्यू यॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT