Dead Body Dainik Gomantak
गोवा

उपजिल्हाधिकाऱ्यांना सवड नसल्‍याने महिलेचा मृतदेह 7 दिवस शवागारात

असंवेदनशीलपणा : नातेवाईकांची परवड

दैनिक गोमन्तक डिजिटल

वादग्रस्त उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांना इन्‍क्वेस्ट पंचनामा करण्यास वेळ नसल्यामुळे एका महिलेचा मृतदेह तब्बल सात दिवस दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पडून राहिला.

अखेर आज सोमवारी सायंकाळी त्यांनी हे सोपस्कार पूर्ण केले. मात्र त्यामुळे त्या मृत महिलेच्या नातेवाईकांना शवागारात उपजिल्हाधिकाऱ्यांची वाट पाहत तिष्ठत राहावे लागले. गोव्यातील शासकीय अधिकारी मृत व्यक्तीशीही कशा प्रकारे असंवेदशीलपणे वागतात, त्‍याचे हे आणखी एक जिवंत उदाहरण होय.

मिळालेल्‍या माहितीनुसार, अर्चना कुमारी या मूळ बिहार येथील महिलेचा तीन वर्षांपूर्वी एका नौदलाच्या जवानाशी विवाह झाला होता. हे दाम्‍पत्‍य वास्को येथे राहत होते. पतीशी झालेल्या क्षुल्लक वादातून 28 फेब्रुवारी रोजी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लग्नानंतर सात वर्षांच्या आत असा प्रकार घडल्‍यास त्‍या प्रकरणाची चौकशी उपजिल्हाधिकाऱ्यांनी करणे आवश्यक असल्याने तिचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता.

विशेष म्‍हणजे त्याच दिवशी निपाणीकर यांनी इन्‍क्वेस्ट पंचनामा करण्याचे मान्य केल्याने मृताचे नातेवाईक शवागारात जमले होते. मात्र त्या दिवशी ते पंचनामा करण्यास आलेच नसल्याने हा पंचनामा शनिवारी दि. 4 मार्चला ठेवण्यात आला होता.

त्यामुळे नातेवाईक पूर्ण दिवस त्यांची वाट पाहत शवागारातच थांबले. पण त्या दिवशीही निपाणीकर यांना सवड नसल्याने त्यांना परत जावे लागले. शेवटी सोमवारी सायंकाळी 5 वाजता त्यांनी हे पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण केले. आता उद्या मंगळवारी तिच्या मृतदेहाची चिकित्सा झाल्‍यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘मला इतर प्रशासकीय कामे आहेत, वेळ नाही’

रविशेखर निपाणीकर यांची मुरगावहून सासष्टी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे. पण त्यांना मुरगावहून रिलिव्ह न केल्याने त्यांच्याकडे दोन्ही ठिकाणचा ताबा आहे. त्‍यामुळे त्यांनी आपल्याला वेळ मिळत नसल्याचे म्हणे सांगितले होते.

‘मला इतर प्रशासकीय कामे आहेत’, असे असंवेदनशील उत्तर त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत निपाणीकर यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना फोन केला असता ‘माझ्याकडे आता मुरगावचा ताबा नाही’ असे त्रोटक उत्तर देत त्यांनी फोन कट केला.

‘सेल्फी’ ठरली आत्‍महत्‍येस कारणीभूत!

अर्चना कुमारी आपल्या पतीबरोबर गोव्यात राहत होती. तिचे आईवडील तिला भेटायला गोव्यात आले होते. त्यांना गोवा दर्शन घडवत असताना तिच्या पतीने तिच्या आईवडिलांसह आपली सेल्फी घेतली. याच कारणावरून नवरा-बायकोत वाद सुरू झाला आणि त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असे समजते.

अन्‌ दुसऱ्या मृतदेहाची अवहेलना चुकली

उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांच्यामुळेच आणखी एका महिलेच्या मृतदेहाचीही अशीच परवड होणार होती. मात्र शेवटी या मृतदेहाचा इन्‍क्वेस्ट पंचनामा दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी केल्याने तिच्या नातेवाईकांच्या वाट्याला येणारे भोग चुकले असेच म्हणावे लागेल.

दीपाली चव्हाण या वेर्णा येथील महिलेचा 3 मार्च रोजी अशाच प्रकारे अपमृत्यू झाला होता. तिचाही इन्‍क्वेस्ट पंचनामा करण्यास सध्या आपल्याला वेळ नाही, त्यामुळे तो सोमवारी करू, असे निपाणीकर यांनी सांगितले. परंतु त्‍यांनी वरपर्यंत वशिला लावून हा पंचनामा प्रभुदेसाई यांच्याकडून करून घेतल्याने त्यांच्या नशिबातील भोग चुकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

SCROLL FOR NEXT