Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 22 वर्षीय तरुणाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; बोळकर्णे साकोर्डातील धक्कादायक प्रकार

Goa Crime News: बोळकर्णे साकोर्डा गावात एका 22 वर्षीय परप्रांतीय युवकाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

साकोर्डा: बोळकर्णे साकोर्डा गावात एका 22 वर्षीय परप्रांतीय युवकाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत युवक मूळचा उत्तर भारतातील असून काही काळापासून साकोर्डा परिसरात वास्तव्यास होता. मंगळवारी (22 जून) सकाळी बोळकर्णे येथील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच कुळे पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला.

दरम्यान, सध्या या घटनेमागचे नेमके कारण अस्पष्ट असून घातपात की आत्महत्या याचा खुलासा पोस्टमॉर्टम अहवालानंतरच होईल. पोलिसांनी (Police) मृताच्या ओळखीची अधिकृत नोंद घेण्यास सुरुवात केली असून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी, हडफडे-बार्देश येथून अशीच घटना समोर आली होती. येथील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पतबित्र दास (वय 26, मूळ रहिवासी पश्‍चिम बंगाल) नावाच्या मुलाने राहत्या भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. पतबित्र दास याचा मृतदेह सिलिंग रॉडला साडीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT