The body of a missing unidentified man was found in Gomecos morgue
The body of a missing unidentified man was found in Gomecos morgue 
गोवा

बेपत्ता अज्ञाताचा मृतदेह गोमेकॉच्या शवागारात

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय(Goa Medical collage) इस्पितळातून ज्येष्ठ नागरिक फ्रांसिस्को झेव्हियर फर्नांडिस(Francisco Xavier Fernandes) बेपत्ता झाल्याची तक्रार आज त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती. मात्र चौकशीअंती त्याचा मृत्यू इस्पितळात 21 एप्रिलला झाला होता व मृतदेह गोमेकॉच्या(Gomaco) शवागारात ठेवण्यात आला होता. त्यामुळे या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याची माहिती आगशीच्या पोलिसांनी(Goa Police) दिली. (The body of a missing unidentified man was found in Gomecos morgue)

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 18 एप्रिलला रात्रीच्यावेळी बाणावली येथील परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका अज्ञात ज्येष्ठ नागरिकाला हॉस्पिसिओ इस्पितळात कोणी तरी दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच रात्री दीडच्या सुमारास या अज्ञात व्यक्तीला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. 21 एप्रिलपर्यंत त्याच्यावर वॉर्ड 113 मध्ये उपचार सुरू असताना त्याचे कोरोनामुळे निधन झाले होते. मृतदेह अज्ञात असल्याने तो गोमेकॉ शवागारात प्लास्टिकमध्ये लपेटून ठेवण्यात आला होता. 

दरम्यान, फ्रांसिस्को फर्नांडिस हा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी आजपर्यंत कोणत्याच पोलिस स्थानकात नोंद केली नव्हती. आज त्याच्या कुटुंबियांनी आगशी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली. गोमेकॉ इस्पितळ शवागारात असलेल्या अज्ञात मृतदेहापैकी माहिती पोलिसांनी मिळवली. त्यातील एक मृतदेह बाणावली परिसरातून हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल झाला होता त्यामुळे तेथील कोलवा पोलिसांशी संपर्क साधून शोध सुरू झाला. त्यावेळी झेव्हियर फर्नांडिस बेपत्ता असल्याचे समोर आले. त्याच्या कुटुंबीयांना मृतदेह ओळखण्यासाठी बोलावले असता तो फ्रांसिस झेव्हियर असल्याचे त्यांनी ओळखले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियाने गोमेकॉ इस्पितळ अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करून फ्रांसिस झेव्हियर फर्नांडिस बेपत्ता होण्यास ते कारणीभूत असल्याचा दावा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT