Drowned 1.jpg 
गोवा

फोंडा: खांडेपार नदीत बुडालेल्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले      

दैनिक गोमंतक

फोंडा: ओकांब-धारबांदोडा येथे खांडेपार नदीत (Khandepar) सोमवारी बुडालेल्या (drowned) दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह मंगळवारी सापडले. सकाळी प्रदीप निंगप्पा मलनावर याचा तर त्यानंतर उशिरा दुपारी सानिया रफिक मुल्ला या विद्यार्थिनीचा मृतदेह शोधून काढण्यात आला. अग्निशामक दलाने (Fire brigade) सुरुवातीला सकाळी प्रदीपचा मृतदेह शोधला, तर त्यानंतर नाविक दलाच्या जवानांनी मोठ्या शिकस्तीने सानियाचा मृतदेह दुपारी शोधून काढला. तिचा मृतदेह 24 तासानंतर सापडला. (The bodies of students of dada vaidya school who drowned in Khandepar river were found)

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदात सोमवारी कुर्टी फोंड्यातील (Ponda) दादा वैद्य विद्यालयातील काही विद्यार्थी पिकनिकला गेले होते. त्यातील प्रदीप आणि सानिया बुडाली होती. दोघेही पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाल्यानंतर लगेच पोलिस व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नव्हता. सकाळी ही शोधमोहिम हाती घेण्यात आल्यानंतर दुपारपर्यंत त्यात यश आले. बुडालेल्या जागेपासून जवळच दोन्ही मृतदेह पाण्यात होते. पाण्यात झाडांची मोठी खोडं असल्याने त्यालाच अडकून हे मृतदेह होते. मात्र पाण्याच्या झोतामुळे शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शोधकार्यावेळी लगतच्या गावातील काही नागरिक तसेच दोन्ही कुटुंबांचे नातेवाईकही उपस्थित होते. 

"त्यांनी" केलेल्या अथक प्रयत्नांमूळे चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरला...

फोंडा पोलिसांनी यासंबंधी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवले. शवचिकित्सेनंतर सानियाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी दीपनगर येथील स्मशानभूमीत सानियावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीप मलनावर यांचा मृतदेह बांबोळी शवागारातून कर्नाटकात आपल्या गावी नेला. मूळ कर्नाटकमधील पण व्यवसायानिमित्त कुर्टी येथे राहणाऱ्या मलनावर कुटुंबियांनी प्रदीपवर आपल्या गावी कर्नाटकात अंत्यसंस्कार केले. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या दुर्देवी निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.              

अन् अश्रूंचा बांध फुटला

बुडालेले दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असून मृतदेह पाहताच या मलनावर व मुल्ला कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. मृतदेह शोधण्यासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्य यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. सोमवारी सकाळी पिकनिक७ला जाताना आपल्या पालकांना योग्य कल्पना त्यांनी दिली नव्हती, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. अल्पवयीन असलेल्या या मुलांनी स्वतःच पिकनिकचा बेत आखला आणि गुपित ठेवल्याची चर्चा यावेळी पालकांत होत होती. मात्र या पिकनिकच्या बेतात हकनाक दोघांचा बळी गेला. पिकनिकला गेलेले अन्य विद्यार्थी झालेल्या घटनेमुळे हबकून गेले आहेत. (goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT