BLTM Conference In Delhi Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ''केवळ समुद्रकिनारे ही गोव्याची ओळख नाही, तर...''; दिल्लीतील परिषदेतून जीटीडीसीची पर्यटकांना साद

BLTM Conference In Delhi: केवळ सागरकिनारे ही गोव्याची ओळख नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन गोवा राज्यात पर्यटनाचे विविध पैलू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

केवळ सागरकिनारे ही गोव्याची ओळख नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन गोवा राज्यात पर्यटनाचे विविध पैलू आहेत. या पैलूंची ओळख सर्वांना व्हावी व जास्तीत जास्त पर्यटकांनी गोव्यात यावे, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे गोवा टुरिझमचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक प्रवीणकुमार फळदेसाई यांनी शुक्रवारी बीएलटीएम परिषदेदरम्यान प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर, ‘यशोभूमी’ मध्ये सुरू असलेल्या बीएलटीएम परिषद आणि प्रदर्शनात गोवा टुरिझमने सहभाग घेतला आहे. पर्यटन, ट्रॅव्हल, हॉटेल उद्योगाशी संबंधित जगभरातील कंपन्या आणि विविध राज्यांच्या पर्यटन विभागांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. वैविध्यपूर्णता आणि आलिशान सोयी सुविधा यासाठी गोव्याचा पर्यटन उद्योग ओळखला जातो. भव्य रेसॉर्टस, उत्कृष्ट जेवण, समृध्द सांस्कृतिक वारसा ही गोव्यातील पर्यटनाची ओळख आहे, असे फळदेसाई म्हणाले.

नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर एक्सपोझिशनची माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे. एकादश तीर्थ सर्किट हे गोव्याचे वैशिष्ट्य बनले आहे. या संधीचा लाभ टूर ऑपरेटर्सनी घ्यावा, असा संदेश देण्यात आला आहे, असे फळदेसाई यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT