Goa Black Panther Dainik Gomantak
गोवा

Goa Black Panther: बाळ्ळी येथे सापळ्यात अडकला ब्लॅक पँथर

आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निश्वास

Akshay Nirmale

Goa Black Panther Caught: दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे वन विभागाने लावलेल्या सापळ्यात ब्लॅक पँथर कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात ब्लॅक पँथरचा वावर असल्याची चर्चा होती. त्यातून आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. तथापि, वन विभागाने सर्वांना आश्वस्त केले होते.

मानवी वस्तीमध्ये घुसून कोणतीही जीवीतहानी होऊ नये म्हणून वन विभागाच्या वतीने ब्लॅक पँथरला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास या सापळ्यात ब्लॅक पँथर अडकला.

दरम्यान, ब्लॅक पँथरला पकडल्याने आसपासच्या गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या ब्लॅक पँथरला सुरक्षित अधिवासात सोडण्यात येऊ शकते. ब्लॅक पँथर हा बिबट्या वर्गातील दुर्मिळ प्राणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT