Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'काला धन' भाजपकडेच आहे, मोदींनी गोव्यातील सभेत अधिकृतपणे घोषणा करावी; अमित पाटकर

Goa Politics: कर्नाटक निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टीमध्येच काळा पैसा फिरत असल्याचा पुरावा आहे.

Pramod Yadav

Goa Politics

खाऊंगा और भाजपा वालोंको खाने दुंगा! कर्नाटक निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टीमध्येच काळा पैसा फिरत असल्याचा पुरावा आहे. 4.8 कोटी रोख सापडलेल्या कर्नाटकच्या भाजप उमेदवाराविरुद्ध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कारवाई करतील का? 'काला धन' भाजपकडेच आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

फ्लाइंग स्क्वॉड टीमने कर्नाटकातील भाजपचे लोकसभा उमेदवार के. सुधाकर यांच्याकडून 4.8 कोटी जप्त केल्याच्या कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सर्व काळा पैसा भाजपकडेच असल्याचा हा पुरावा आहे अशी बोचरी टीका केली.

देशभरातील एकामागून एक घटना भाजपच्या भ्रष्ट राजवटीचा पर्दाफाश करत आहेत. भ्रष्टाचाराच्या विषाणूला मारण्याची वेळ आली असून भाजपला कायमचा धडा शिकवण्याचे मी गोमंतकीयांना आवाहन करतो, असे अमित पाटकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सांकवाळ येथिल महाभ्रष्टाचार झालेल्या कोमुनीदाद जागेवरील त्यांच्या सभेत कर्नाटकात सापडलेल्या या मोठ्या रोकड जप्तीवर बोलण्याचे धाडस करावे. सदर सभेसाठी रिअल इस्टेट माफियांनी गिळंकृत केलेल्या जागेची निवड करणे म्हणजेच कठपुतळी नरेंद्र मोदींची तार भांडवलदारांशी असल्याचे उघड होते, असे अमित पाटकर म्हणाले.

नोटबंदीनंतर काळा पैसा नष्ट होईल, असा दावा प्रधानमंत्री मोदींनी केला होता. हे जर सत्य असेल तर भाजपच्या उमेदवारांकडे एवढी रोकड कशी काय आली हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी गरीब जनतेची फसवणूक केली आणि आता जनताच त्यांना धडा शिकवणार आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

SCROLL FOR NEXT