Murmugao: मुरगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून (Ration) चोरट्या मार्गाने तांदुळाच्या भरलेल्या पिशव्या ब्लॅकने देण्याचे प्रकार सुरू आहे. नवे वाडे वास्को येथे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 11 मधून अवैध्य धान्य विक्रीचा काळाबाजार होत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गोवा फर्स्ट (Goa First) या बिगर सरकारी संस्थेने अन्नधान्याचा बेकायदेशीर काळ्या बाजारातून विक्री बद्दल संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
नवे वाडे येथे एम शेटगावकर यांच्या मालकीच्या दुकान क्रमांक 11 या स्वस्त धान्य दुकानातून अनोळखी व्यक्तीला अन्नधान्य विकले असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. धान्य विक्रीची अंतिम तारीख प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला आहे. परंतु धान्याची अवैध्य विक्री दर महिन्याच्या 22 तारखे नंतर 30 आणि 31 तारखेपर्यंत होते. मुरगाव तालुक्यात असलेल्या सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रत्येक महिन्याचे धान्य विक्रीस नागरिक पुरवठा संचालनालयाने त्यांना पीओएस मशीन उपलब्ध करून दिल्याने आणि अंगठ्याचा ठसा आणि निवडलेल्या प्रमाणानंतरच अन्नधान्य देणे बंधनकारक आहे. मात्र अजून या स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात काळाबाजार करणाऱ्यांना अवैद्यरित्या विक्री केली जात आहे. हे नुकतेच नवेवाडे वास्को (Vasco) येथे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 11 मधून अन्नधान्याचा काळाबाजार झाल्याचे उघड झाले आहे.
नागरीपुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे मुरगाव कार्यालयीन प्रभारी आणि मुरगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याविरोधात काळ्याबाजारात धान्य विकल्याबद्दल 'गोवा फर्स्ट' या बिगर सरकारी संस्थेने तक्रार दाखल केली आहे. मुरगाव तालुक्यात मुख्य म्हणजे वास्को पालिका क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.
गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने हा काळाबाजार उघड केला आहे. यापूर्वी गोवा फस्टने स्वस्त धान्य दुकानातून धान्याची भरलेली 50 किलो वजनाची गोणी घेऊन जाताना पकडले, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. नागरी पुरवठा विभाग स्वस्त धान्य दुकानदारांना सहकार्य करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या आशीर्वादाने स्वस्त धान्य दुकानमालकांचा धान्याचा काळाबाजार तेजीत चालला असल्याचा आरोप गोवा फस्टने केला आहे.
धान्य दुकानांचे लेखापरीक्षण करून त्या दुकानदाराला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी संबंधितांकडे करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही. या अनुदानित धान्यावर केंद्र व राज्य सरकार करदात्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. त्यामुळे गरजेनुसार स्वस्त धान्य मिळते; पण स्वस्त धान्य दुकानदार आणि काळाबाजार करणाऱ्यांच्या कमिशनसाठी धडपडणारे विभागाचे अधिकारी यावर कारवाई करत नाही. नागरी पुरवठा संचालकांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती संस्थेने केली आहे. तसेच मुरगावचे मामलेदार नोडल अधिकारी आहेत. त्यांनी मुरगावच्या विभागीय प्रमुखांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी या संस्थेने 06 डिसेंबर तेव्हा शंभर किलो वजनाच्या असल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या असून, सरकारी संस्थेने त्याचे बिंग फोडले आहे. 2021 रोजी एका दुकानदाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती.दोन तांदळाच्या गोण्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले होते. मात्र त्या स्वस्त धान्य दुकानदारावर अजून कारवाई झालेली नाही. स्वस्त धान्य दुकान मालक 50 किलो तांदुळ काळ्या बाजारात अजून विकत असल्याचे उघड झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.