Panjim : राजधानी पणजीतील मांडवी नदीच्या तिरी दरवर्षी गणेशोत्सानिमित्त भरणाऱ्या गोकुळाष्टमी फेरीच्या अर्जाच्या विक्रीचा मोठा प्रमाणात काळाबाजार झाला असून 200 रुपयांचे अर्ज दहापटीने विकले गेले. एका नगरसेविकाच्या पतीने काही अर्ज महापालिकेच्या जवळच विकल्याची चर्चा दिवसभर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. सुमारे 408 स्टॉल्सना परवानगी देण्यात आली असली तरी स्टॉल्सचा घोळ संध्याकाळपर्यंत सुरू होता.
या फेरीसाठीच्या अर्जांच्या वितरणावर पणजी महापालिकेचे कोणतेच नियंत्रण नसल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. ‘ही गोकुळाष्टमची फेरी असल्याने अधिक तर फर्निचर विक्रेत्यांना अर्ज देण्यात आले आहेत. यावरूनच इतर विक्रेत्यांनी गोंधळ घातला. 30 ऑगस्टपर्यंत सुरू असणाऱ्या या फेरीच्या स्टॉल्ससाठी प्रत्येकाला 9760 रुपये भरावे लागणार आहेत. फेरीसाठीच्या अर्जांची अधिक किंमतीने विक्री केल्याची माहिती नाही’ अशी प्रतिक्रिया नगरसेवक तथा महापालिका पणजी मार्केट समितीचे अध्यक्ष बेंटो बार्रेटो यांनी दिली.
408 स्टॉल्सना परवानगी
महापालिकेने मांडवी किनारी पदपथावर 408 स्टॉल्सना परवानगी दिली. यात कपडे, गृहोपयोगी वस्तू या स्टॉल्सचा समावेश असून अधिक स्टॉल्स फर्निचरचे आहेत. काळाबाजार करून काहींनी एकापेक्षा अधिक अर्ज घेऊनही स्टॉल्स मिळवले. बहुतेकजण हे पणजी मार्केटमधीलच व्यापारी आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.