Hoardings in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपचेच होर्डिंग्‍स निवडणूक आयोगाच्‍या कचाट्यातून कसे काय सुटले?

राज्‍यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर निवडणूक आयोगाने सर्वप्रथम होर्डिंग्‍स लक्ष्‍य केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर निवडणूक आयोगाने सर्वप्रथम होर्डिंग्‍स लक्ष्‍य केले. रविवारपासून ही मोहीम व्‍यापक करताना तृणमूल काँग्रेस, आप, काँग्रेस पक्षाच्‍या होर्डिंग्‍सना अचूक हेरले व ते टराटरा फाडलेसुद्धा. तर काही ठिकाणी त्‍या पक्षाच्‍या श्रेष्ठींच्‍या फोटोंना काळा व निळा रंग फासून ते लपविण्‍याचा प्रकार खुलेआम सुरू झाला. मात्र, या मोहिमेत भाजपच्‍या (BJP) होर्डिंग्‍सना झुकते माप दिले, त्‍याबद्दल लोकांकडून आश्‍चर्य व्‍यक्त केले जात आहे. (Goa Assembly Election Latest Update)

आचारसंहिता समान न्‍यायाप्रमाणे सर्वांनाच लागू झाल्‍यास ती आदर्शवत ठरू शकते. पण, कारवाईबाबत होणारा पक्षपात लोकांच्‍याही निदर्शनास ठळकपणे आल्‍याने ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. या मोहिमेदरम्‍यान काही ठिकाणी पोलिसांची फौज दिमतीला ठेवली होती.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्‍यासाठी रविवारपासून व्‍यापक मोहीम राबविताना सर्वप्रथम ‘आप’चे (AAP) बॅनर्स हेरले व त्‍यावरील मथळा व छायाचित्र कसे लपविता येईल, याबाबत रंगरंगोटी सुरू केली. करासवाडा, म्‍हापसा, पर्वरी परिसरात बॅनर्स, स्‍टिकर दिसला की, त्‍यावर रंगरंगोटीचे काम सुरू केले. असे अनेक बॅनर्स अवघ्‍या दोन दिवसांत मिटविण्‍यात आले, हे सोमवारी लोकांच्‍या निदर्शनास आले. या मोहिमेदरम्‍यान तृणमूल काँग्रेसच्‍या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्‍या बॅनर्स व होर्डिंग्‍सची अक्षरश: विटंबना केली. चेहऱ्यावर काळा रंग तर काही ठिकाणी निळा रंग फासून कारवाई केली. मात्र, या प्रयत्‍नात होर्डिंग्‍सवरील तिरंग्‍याला कोणतीही हानी पोहोचविली नाही., एवढी खबरदारी निवडणूक आयोगाच्‍या मोहिमेवरील कर्मचाऱ्यांनी घेतली होती.

‘काल अकाल’ नेमके काय?

ग्रीनपार्क येथून पणजीच्‍या दिशेने येताना काही ठराविक मोक्‍याच्‍या अंतरावर ‘गोंयची नवी सकाळ’ असा मथळा व ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची ठळक छबी असणाऱ्या होर्डिंग्‍सना रंगकाम केले, तर काही ठिकाणी नेमके छायाचित्र टराटरा फाडल्‍याचे निदर्शनास येत आहे. आश्‍‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे काही अवलीया कर्मचाऱ्यांनी ‘काल अकाल’ असे शब्‍द नेमके ठेवून काय साध्‍य केले, याबाबत लोकांकडून आश्‍चर्य व्‍यक्त केले जात आहे. कर्मचारी हे शब्‍द फासण्‍यास कसे काय विसरले, याबाबत जनतेकडून प्रश्‍‍न उपस्‍थित केला जात आहे. काहीजण ही अजब कारवाई आपल्‍या मोबाईलवर टिपत होते.

मग ‘ती’ होर्डिंग्‍स नजरेआड कशी झाली?

म्‍हापसा-गिरी परिसरातील होर्डिंग्‍सविरुद्ध कारवाई करताना निवडणूक आयोगाने काँग्रेसच्‍या होर्डिंग्‍सविरुद्ध कारवाई केली. जनतेला संदेशात्‍मक ठरणारा मथळा व छायाचित्र फासण्‍यात आले. यावेळी निळ्या रंगाचा वापर करण्‍यात आला. मात्र, त्‍याच्‍या बाजूला भाजपचा मथळा असलेले होर्डिंग्‍स पांढऱ्या शुभ्र रंगाच्‍या बॅनर कापडाने झाकून ठेवले. पूर्णत: होर्डिंग्‍स कसे सुरक्षित ठेवता येईल, याबाबतची दक्षता बहुधा निष्ठवानाने बाळगली असावी? किंवा तो कर्मचारी ‘कमळ’प्रेमाचा असावा, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्‍यक्त होत आहे. तसेच पर्वरी बाजार परिसरात महामार्ग विस्‍तारीकरण श्रेय लाटण्‍यासाठी उभारण्‍यात आलेले होर्डिंग्‍स दिमाखात उभे होते. त्‍यावर केंद्रीयमंत्री गडकरी, पंतप्रधान मोदी, मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची छबी व महामार्गाचे छायाचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ते होर्डिंग्‍स निवडणूक आयोगाच्‍या कचाट्यातून कसे काय सुटले, असा प्रश्‍‍न पर्वरीवासीय उपस्‍थित करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT