मडगाव: एक सासष्टी तालुका वगळता दक्षिण गोव्यातील उर्वरित सहा तालुक्यांत सत्ताधारी भाजप आमदारांनी आपली पत राखून ठेवली असून या निवडणुकीने काँग्रेसचे अस्तित्व केवळ सासष्टीतील काही भागापुरते राहिल्याचे दाखवून दिले.
(BJP's dominance in South Goa forever)
सासष्टी तालुक्यातील ३३ पैकी चांदर, गिरदोळी आणि माखाझन या तीन पंचायतींवर काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे पॅनल निवडून आले तर वेळ्ळी पंचायतीवर काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांचे पॅनल निवडून आले.
वार्का पंचायतीतून चर्चिल आलेमाव यांच्या कन्या शेरॉन डिकॉस्ता, बेतालभाटी पंचायतीत मिकी पाशेको यांच्या पत्नी व्हियोला पाशेको तर नुवे पंचायतीतून माजी आमदार बाबाशान यांच्या पत्नी फ्रेडा डिसा निवडून आल्या. या उलट नावेलीत भाजपचे आमदार असतानाही रुमडामळ पंचायतीत भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांना पराभव स्वीकारावा लागला.
मुरगाव तालुक्यात चिखली आणि बोगमाळो पंचायतीवर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचे पूर्ण वर्चस्व राहिले. साकवाळ पंचायतही भाजपकडेच राहणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. केपे तालुक्यातील शेल्डे व असोल्डा पंचायती नीलेश काब्राल यांनी राखून ठेवल्या, तर केपे मतदारसंघात काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता यांना फक्त मोरपिर्ला आणि बाळ्ळी या दोन पंचायतींवर समाधान मानावे लागले.
फातर्पा पंचायतीत डिकॉस्ता यांचे भाऊ संजील यांना पराभव स्वीकारावा लागला. काणकोण तालुक्यावर सभापती रमेश तवडकर, सांगेत सुभाष फळदेसाई, धारबांदोडा येथे गणेश गावकर तर फोंड्यात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे आणि सुदिन ढवळीकर या चारही मंत्र्यांनी आपले गड शाबूत ठेवले.
डिचोली येथील सातेरी मंदीर चोरट्यांनी फोडले
डिचोली येथील सातेरी देवीचे मंदीर फोडत चोरट्यांनी दोन लाखाचे दागिने लांबवले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु केला आहे.
सविस्तर वृत्त असे की डिचोली येथील सातेरी देवीचे मंदीर चोरट्यांना काल रात्री फोडले आहे. गुरुवारी रात्री याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चोरट्यांनी देवीच्या मंदिराचा पुढचा दरवाजाचे गज वाकवत मंदिरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील सोनेरी मणी तसेच ठेवले मात्र इतर सर्व दागिने लांबवले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.