Giriraj Pai Vernekar And Amarnath Panajikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपचा डिएनए गोंधळला की ते 'आरएसएस'च्या कुबड्या वापरतात; काँग्रेसची वेर्णेकरांवर टीका

St. Francis Xavier Goa: सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवणार? नाही! कारण जर त्यांनी कुबड्यांवर कारवाई केली तर ते कसे उभे राहतील?,' असा सवाल काँग्रेसने केला.

Pramod Yadav

पणजी : भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर पराभूत झाले असून त्यांच्याकडे भाजपचा बचाव करण्यासाठी ठोस भूमिका नाही, म्हणून ते हिंदु संघटनेचे कार्ड वापरत आहेत, अशी टीका काँग्रेसचे मिडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी गुरुवारी केली.

युरी आलेमाव यांनी हिंदु संघटनांच्या विरोधात काहीही म्हटलेले नाही. भाजपचे नेते जेव्हा असामाजिक घटकांना आश्रय देतात आणि जनतेच्या रोषाला आमंत्रण देतात. त्यांचा डीएनए गोंधळून जातो, तेव्हा ते आरएसएसच्या कुबड्यांचा वापर करतात. दुसरं म्हणजे आम्ही नथुराम गोडसेच्या नव्हे, तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारधारेचं अनुसरण करतो,' असं पणजीकर म्हणाले.

'गिरिराज वेर्णेकर यांचा पराभव झाला आहे. जमीन रूपांतरण, डोंगर कापणी आणि इतर भ्रश्टाचारावर भाजपचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे काहिच उरलेले नाही. भाजपच्या आघाडय़ांनी निर्माण केलेला जातीय तेढ याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही.

स्मार्ट पणजीच्या घोटाळ्यांनी गिरीराजांचे तोंड बंद केले आहे. त्यामुळे आलेमाव यांच्यावर खोटी विधाने करण्यात त्यांना आनंद वाटतो,' असे पणजीकर म्हणाले.

'गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपने मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरण केले आहे, राज्याची मालमत्ता भांडवलदारांना विकली, कला अकादमीतील भ्रष्टाचार, नोकरी विक्री, कायदा व सुव्यवस्था ढासळणे, बेरोजगारी, मिशन टोटल कमिशन, रस्ते अपघात, रस्त्यावरील खड्डे अशा अनेक मुद्द्यांवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे गोंधळलेल्या भाजपने आरएसएसच्या कुबड्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे,' अशी टीका पणजीकर यांनी केली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर आरोप करण्याऐवजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इतर धर्माविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याचा शब्द पाळला पाहिजे.

सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवणार? नाही! कारण जर त्यांनी कुबड्यांवर कारवाई केली तर ते कसे उभे राहतील?,' असा सवाल त्यांनी केला.

आमच्यात आणि भाजपमध्ये फरक आहे, आम्ही राजकीय लाभ मिळवण्यासाठी धर्माचे कार्ड वापरत नाही, असे पणजीकर म्हणाले.

भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींतून स्वताला संरक्षित करण्यासाठी भाजप आपल्या डीएनएच्या सवयीप्रमाणे कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा पर्याय निवडण्याची मुभा देतो, ज्याचा वापर गिरीराज पै वेर्णेकर करत आहेत, असे पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT