Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Goa News : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देश सुरक्षित; लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा संधी द्यावी : माविन गुदिन्हो

मयेत ‘लाभार्थी मेळाव्या’त पंचायत मंत्र्यांकडून मार्गदर्शन

दैनिक गोमंतक

Bicholim : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे देश सुरक्षित आणि प्रगतिपथावर आहे. गोवा राज्यातही विकासाची घोडदौड सुरू असून पर्यावरणाचा सांभाळ करूनच राज्याचा विकास करण्यासाठी सरकार आग्रही आहे, असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

मये येथे ‘लाभार्थी मेळाव्या’त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘काम सरो, वैद्य मरो’ याचे अनुकरण न करता जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन गुदिन्हो यांनी करुन जनता भाजपच्याच बाजूने राहील, असा विश्वास व्यक्त केला.

कुंभारवाडा-मये येथील श्री सातेरी देवस्थान सभागृहात या लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत, भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद महांबरे, मयेच्या सरपंच सुवर्णा चोडणकर, पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी, भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, महिला मोर्चा अध्यक्ष आरती बांदोडकर उपस्थित होत्या.

कवाथे, मंजुरीपत्रांचे वाटप

या मेळाव्यात अटल आसरा योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. कवाथ्यांचेही यावेळी वाटप करण्यात आले. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या पत्नी प्रिया शेट यांच्यासह शीतल सावळ आणि देविया धावस्कर या लाभार्थींनी भाजप सरकारने सुरू केलेल्या योजना किती आणि कशा लाभदायक आहेत त्याबद्दल आपला अनुभव कथन केला. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले. पार्सेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT