Girish Chodankar DainikGomantak
गोवा

'काँग्रेस फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न, कोट्यांवधींचे आमिष'

भाजपतर्फे पोस्टल मतदाराला 10 हजार रुपये देण्यात येत आहेत; गिरीश चोडणकर

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे सत्तेसाठी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. एका आमदाराला कोट्यांवधी रुपये देण्याचे आमिष दाखवले जाते आहे. यासाठी विश्‍वजित राणे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) काँग्रेस उमेदवारांच्या शोधात आहेत. तसेच भाजपतर्फे (BJP) पोस्टल मतदाराला 10 हजार रुपये देण्यात येत आहे. काहींवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे (Congress) अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. चोडणकर पुढे म्हणाले, मतदारांनी भाजपला नाकारलेले आहे. कारण भ्रष्टाचार, नोकरभरती घोटाळ्यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले. विकासाच्या नावावर फसवणुक केली. काँग्रेस व इतर पक्ष फोडून सत्ता टिकवली, याचा राग जनतेने मतदानाद्वारे काढला आहे. त्यामुळे पराभव दिसत असल्यामुळेच त्यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण कॉंग्रेसचे कोणीही फुटणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT