Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सुदिन ढवळीकरांविरोधात भाजप आक्रमक, मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी

Sudin Dhavalikar VS Goa BJP: मडकई मतदारसंघातील बूथ क्रमांक 18 वर अत्यंत कमी मते भाजप उमेदवाराला कशी काय पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

मगोप आणि भाजप यांची युती असली तरीही या दोन्ही पक्षांचे नाते अनेकदा 'विळा आणि भोपळा' असेच राहिले आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दक्षिण गोव्यातील लोकसभा निकालावरून भाजपला घरचा अहेर दिल्यानंतर मडकईतील भाजप कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला कमी मते पडली, त्याला भाजप कार्यकर्तेच कारणीभूत असल्याचा मडकई मतदासंघाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेला आरोप पूर्णतः चुकीचा असून, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना आधी मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी जोरदार मागणी भाजप मंडळ तथा मडकई मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

फोंड्यात आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी सुदेश भिंगी व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी संतोष रामनाथकर, प्रशांत नाईक, जयराज नाईक, दिनेश वळवईकर, सुभाष गावडे आदी उपस्थित होते.

भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केलेल्या कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा हा प्रयत्न असून, सुदिन ढवळीकर यांच्यावर आधी कारवाई करा, असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांचे काही प्रश्न

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवाराला 4,000 मते, तर मगोप उमेदवाराला 13 हजार 936 मते पडली. ही एवढी मते लोकसभा निवडणुकीत का पडली नाहीत?

याचे उत्तर सुदिन ढवळीकर यांनी खरे म्हणजे द्यायला हवे होते, असे सांगत मडकई मतदारसंघातील बूथ क्रमांक 18 वर अत्यंत कमी मते भाजप उमेदवाराला कशी काय पडली, त्याचाही विचार मगोपच्या नेत्यांनी करावा, असा सल्ला यावेळी देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT