Goa Zilla Panchayat Election
Goa Zilla Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat Election : दवर्ली, रेईस मागूशमध्ये भाजप; तर कुठ्ठाळीत अपक्षाची बाजी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Zilla Panchayat Election : भाजपचे परेश नाईक दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. 706 मतांच्या फरकाने परेश नाईक यांनी ही निवडणूक जिंकली आहे. तर भाजप उमेदवार संदीप बांदोडकर रेईस मागूश मतदारसंघातून विजयी झाले आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मर्सिआना मेंडिस ई वाझ यांनी निवडणूक जिंकली आहे.

आप, काँग्रेस, आरजी आणि अपक्ष यांच्यात भाजप विरोधी मते विभागली गेल्याने दवर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा बाजी मारली. भाजपच्या परेश नाईक यांनी ही निवडणूक 706 मतांनी जिंकताना या मतदारसघात भाजपला विजयाची हॅटट्रिक करून दिली.

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी संपली तेव्हा भाजपचे परेश नाईक यांना 4080 तर आपचे सिद्धेश भगत याना 3374 मते मिळाली . काँग्रेसचे लियोन रायकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना फक्त 1089 मते घेता आली. आरजीच्या अँड्र्यू रिबेलो याना 784 तर अपक्ष मुर्तूजा कुकनुर याना 560 मते मिळाली अन्य दोन अपक्षांनी किरकोळ मते घेतली. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा सांघिक विजय असे नाईक यांनी सांगितले. यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दुसरीकडे रेईस मागूश मतदारसंघात भाजपचे संदीप काशिनाथ बांदोडकर विजयी झाले आहेत. तब्बल 4244 च्या मताधिक्याने बांदोडकर यांनी ही निवडणूक जिंकली आहे. या मतदारसंघात 1101 मतं मिळवत अपक्ष उमेदवार साईनाथ कोरगावकर दुसऱ्या स्थानी राहिले. तर 1091 मतांसह राजेश दाभोळकर तिसऱ्या स्थानी आहेत. काँग्रेस उमेदवार प्रगती संदीप पेडणेकर यांनी 509 मतं मिळवली आहेत.

कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार मर्सिआना मेंडिस इ वाझ यांनी 4453 मतं मिळवत विजय संपादन केला आहे. अपक्ष उमेदवार लेस्लि आग्नेलो गामा यांना 1511 तर काँग्रेसच्या वॅलेंट बारबोसा यांना 1360 मतं मिळाली आहेत. तर आम आदमी पार्टीच्या जॉन डिसा यांना 293 मतं मिळाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT