Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपला 27 जागा मिळणार

माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक यांना विश्वास

दैनिक गोमन्तक

फोंडा : माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी आगामी निवडणुकीत भाजपला तब्बल 27 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. भाजप सोडून बाहेर गेलेल्या नेत्यांमुळे किंवा त्यांच्या नाराजीनाट्यामुळे भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही रवी नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. फोंड्यात पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. (Ravi Naik on Goa Elelction 2022)

फोंडा हा गोव्यातील तिसरा जिल्हा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्याला तसं आश्वासनही दिलं आहे. त्यामुळे लवकरच फोंडा (Ponda) जिल्हा म्हणून नावारुपाला येईल, असंही रवी नाईक यांनी स्पष्ट केलं. फोंडा परिसरातील लोकांना याचा निश्चितच फायदा होईल असंही रवी नाईक यांनी म्हटलं आहे.

मायकल लोबो (Michael Lobo) किंवा अन्य नेत्यांनी भाजप सोडल्यामुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे गोव्यात लवकरच भाजपचंच सरकार सत्तेत येणार असंही रवी नाईक म्हणाले. खाण पट्ट्यात असलेली नाराजीही दूर होणार असून ते भाजपच्याच (BJP) बाजूने उभे राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT