तृणमूलच्या ‘त्या’ कार्टूनवर भाजपची आक्रमक भुमिकी  Dainik Gomantak
गोवा

तृणमूलच्या ‘त्या’ कार्टूनवर भाजपची आक्रमक भुमिकी

पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पायाखाली चिरडण्याचे चित्रं उभे करणे, ही तृणमूलची हिसंक वृत्तीचे दर्शन घडविते.

दैनिक गोमन्तक

पणजी: तृणमूल काँग्रेसच्या ‘गोंयची नवी सकाळ’ या ट्विटर हॅण्डलवर अपलोड आणि नंतर काढलेल्या कार्टूनबाबत भाजपाने खूपच गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भाजप आणि गट मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यात ठिकठिकाणी निषेध करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनी दिली.

गोवा हा शांतताप्रीय आणि सर्वधर्मसमभाव प्रदेश असल्याने राज्यातील आगामी निवडणुकाही अशाच प्रकारच्या व्हाव्यात, अशी भावना भाजपची आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यवस्थेला चिरडून टाकण्याची ही भावना निषेध करण्यासारखी आहे. पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पायाखाली चिरडण्याचे चित्रं उभे करणे, ही तृणमूलची हिसंक वृत्तीचे दर्शन घडविते. अशा हिंसक वृत्तीच्या लोकांना गोमंतकीय स्थान देणार नाहीत, हे तृणमूलने समजून घ्यावे, असेही तानावडे यांनी सांगितले.

तृणमूलचे कार्टून

तृणमूल काँग्रेसच्या ‘गोंयची नवी सकाळ’ या ट्विटर हॅण्डलवरून रविवारी नवे वादंग उठले होते. या ट्विटमध्ये त्यांनी ममता बॅनजी आपल्या पायातील चपलेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना चिरडत आहेत, अशा आशयाचे एक पोस्टर अपलोड केले होते. या पोस्टरबाजीमुळे काल दिवसभर समाज माध्यम ढवळून निघाले आणि अनेकांनी तृणमूलच्या या कृत्याची निंदाही केली. टीकेच्या भडिमारानंतर ‘तृणमूल’ने दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शेअर केलेले ट्विट अखेर मागे घेतले. तृणमूलच्या या कृत्याची भाजपने गंभीर दखल घेतली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसने माफी मागितली पाहिजे अन्यथा आम्ही त्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही. हा आमचा इशारा आहे.

- उर्फान मुल्ला, प्रवक्ते भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT