BJP vs TMC Poster war ahead of Goa Assembly Election Dainik Gomantak
गोवा

गोवा निवडणुकीपूर्वीच 'पोस्टर वॉर'

तृणमूलचे कार्टून अन् भाजपकडून विद्रुपीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभेच्या : निवडणुका अद्यापी चार महिने दूर असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून 'रण' पेटले आहे. तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभेची निवडणूक खूपच गांभीर्याने घेतल्याने सर्व प्रकारची यंत्रणा कामाला लावली आहे. आता प्रत्यक्ष पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबरला राज्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने कार्टून जारी केले आहे.

GOENCHI NAVI SAKAL या ट्विटर हॅन्डलवरून एक पोस्ट करण्यात आली होती. यात पं. बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या पायाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पायाखाली चिरडल्याचे दाखवल्याने भाजप कार्यकत्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने राज्यभर लावलेल्या होर्डिग्ज आणि बॅनरवर ममता बॅनर्जी यांच्या तोंडाला काळे फासले आहे.

भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी तृणमूलच्या कार्टूनबाबत तीव्र आक्षेप नोंदवत बॅनर्जी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून, जशास तसे उत्तर दिले जाईल असे जाहीर आव्हान दिले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीतर तृणमूलच्या सभा उधळून लावा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे.

राजकीय जीवनात नैतिकता असते. त्याची पातळी तृणमूल काँग्रेस सोडताना दिसत आहे. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. तरीही तृणमूल काँग्रेसची कृती ही अयोग्य असल्याने आम्ही त्याचा निषेध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एका राज्याचे नेतृत्व करीत नसून, ते संपूर्ण भारताचे नेते आहेत. चुकीच्या पोस्टरबाजीतून तृणमूलने आपली नैतिकता दाखवून दिली आहे. पण, आम्ही यापुढे गप्प राहणार नाही.

- दामू नाईक, प्रवक्ते गोवा भाजप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT