Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: '2047 पर्यंत दिल्ली आणि गोव्यात भाजपच सत्तेत राहणार'; मुख्यमंत्री सावंतांना विश्वास

Delhi Election Result: भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाले असून, २७ वर्षानंतर ते राज्यात सत्ता स्थापन करतील.

Pramod Yadav

पणजी: भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात बहुमत मिळाले आहे. भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या असून, सत्तेत असलेल्या केजरीवालांच्या आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या मिळालेल्या विजयाचा गोव्यात देखील जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी २०४७ पर्यंत दिल्ली आणि गोव्यात भाजपचेच सरकार असेल, असा विश्वास व्यक्त केला.

राजधानी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर सकारात्मक झालेल्या भाजपने दिल्लीत जोरदार प्रचार करत २७ वर्षानंतर सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

"दिल्लीत प्रचार करत असताना तेथील लोक आपच्या सत्तेला कंटाळले असल्याचे दिसून आले. दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची वाट आपण गेल्या दहा वर्षापासून पाहत होतो. आता भाजपला राज्यात बहुमत मिळाले असून, मी पंतप्रधान मोदी, जे. पी. नड्डा यांचे अभिनंदन करतो."

"आम आदमी पक्षाने गेल्या दहा वर्षापासून देशाची राजधानी दिल्लीत घाण केली होती, ती स्वच्छ करण्याची संधी नागरिकांनी भाजपला दिली आहे. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा संदेश लोकांनी दिला आहे. मद्य घोटाळ्यात आपचे पाच नेते तुरुंगात होते. डबल इंजिन सरकार असेल तर विकास होतो हे नागरिकांना आता समजलंय", असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले.

'दिल्ली आणि गोव्यात २०४७ पर्यंत सरकारच सत्तेत राहणार', असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. गोवा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त करताना दिल्लीतील नागरिकांचे आभार मानत विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल देखील नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. तसेच, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांचा देखील पराभव झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत चर्चा सुरु झालीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT