Damu Naik Goa Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: श्रेष्‍ठींची पसंती एकनिष्‍ठ 'दामू नाईकांच्या' नावाला! 'दिल्ली'च्या घोषणेकडे सगळ्यांची नजर

BJP state president position: २०२७ पर्यंत ते पक्षासाठी पूर्णवेळ काम करू शकतील, असा अहवाल सुकाणू समितीने दिल्‍लीत पाठवला आहे. पुढील दिवसांत दामू यांचे नाव जाहीर होऊ शकेल, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

Sameer Panditrao

BJP state president position selection news

पणजी: ‘भाजप प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी श्रेष्‍ठींकडून माजी आमदार दामू नाईक यांना झुकते माप मिळाले आहे. पुढील आठ दिवसांत तशी दिल्‍लीतून घोषणा होईल’, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज ‘भाजप प्रदेशाध्‍यक्ष पदाच्‍या शर्यतीत आपण नाही’, असे जाहीर केले आहे.

भाजप प्रदेशाध्‍यक्ष पदाच्‍या निवडणुकीसाठी दामू नाईक, ॲड. नरेंद्र सावईकर, दिलीप परूळेकर, दयानंद मांद्रेकर, दयानंद सोपटे, चंद्रकांत (बाबू) कवळेकर, गोविंद पर्वतकर ही नावे चर्चेत राहिली; परंतु अंतिमत: दामू नाईक आणि ॲड. सावईकर वलयांकित राहिले. दामू नाईक हे विधानसभेला तीनदा पराभूत होऊनही भाजपशी एकनिष्‍ठ राहिले.

त्‍यांनी फातोर्डा येथून मतांची टक्‍केवारी वाढवत नेली. मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍या ते खास मर्जीतील राहिले. २०२७ पर्यंत ते पक्षासाठी पूर्णवेळ काम करू शकतील, असा अहवाल सुकाणू समितीने दिल्‍लीत पाठवला आहे. पुढील दिवसांत दामू यांचे नाव जाहीर होऊ शकेल, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

...‘ती’ शक्यता मावळली

पणजीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्यासमवेत झालेल्‍या बैठकीत संभाव्‍य उमेदवारांची यादी करण्‍यात आली; परंतु राज्‍यातील वजनदार मंत्र्यांसह काही आमदारांनी तानावडे हेच प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी योग्‍य असल्‍याचा सूर आळवला आणि तानावडेंचीच पुन्‍हा वर्णी लागू शकेल, अशी शक्‍यता वर्तवली जाऊ लागली. डिचोलीतील एका कार्यक्रमात ‘पक्षाने कोणतीही जबाबदारी दिल्यास स्वीकारण्यास तयार आहे’, असे तानावडे यांनी केलेले वक्‍तव्‍य सूचक मानले गेले; परंतु रविवारी त्‍यांनी स्‍वत:च स्‍पर्धेत आपण नसल्‍याचे जाहीर केले.

भंडारी समाजाचाही विचार

प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी भंडारी समाजातील व्‍यक्‍तीची निवड व्‍हावी, अशा धारणेतून एका बाजूने जोरदार लॉबिंग सुरू आहे. पाठविलेल्‍या यादीत भंडारी ज्ञातीमधील घटक अधिक आहेत.

प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी ॲड. सावईकरही वलयांकित राहिले. ते संघाला निकट आहेत. संघ परिवारात त्‍यांची चांगली ऊठबस आहे. क्षमता असूनही लोकसभेला तिकीट न मिळाल्‍याने त्‍यांचे पुनर्वसन करावे, असा एक अंतर्गत सूर राहिला.

तथापि, सावईकर निवडले गेल्‍यास भंडारी समाज नाराज होऊ शकतो, असा विचारही एका बाजूने मांडला गेला.

अलीकडच्‍या काळात दामू हे मुख्‍यमंत्र्यांच्‍या मर्जीतील नेते बनले आहेत. शिवाय ते भंडारी समाजाचे प्रतिनिधी आहेत.

मी स्‍पर्धेत नाही, तानावडे यांनी केला खुलासा

१. मृदु व लाघवी स्‍वभावाचे दामू नाईक हे भाजपचे जुने कार्यकर्ते. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्‍या कार्यकाळापासून निष्‍ठावान म्‍हणून त्‍यांचा लौकिक आहे.

२. दामू यांना समकालीन भाजप नेत्‍यांची विविध पदांवर वर्णी लागली वा त्‍यांनी आपल्‍यातील मूल्‍यांचा यथायोग्‍य वापर करून मंत्रिपदे भूषविली.

३. दामू फातोर्डामधून तीनदा विधानसभा लढले; दुर्दैवाने ते अयशस्‍वी ठरले. परंतु सातत्‍याने जनसंपर्क वाढवण्‍यावर त्‍यांचा भर राहिला.

४. शिवाय ते उपेक्षित आहेत, अशी कार्यकर्त्यांची भावना बनली होती. परिणामी प्रदेशाध्‍यक्ष पदासाठी त्‍यांच्या नावाचा बोलबाला राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT