B L Santosh Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: संतोष यांच्या गोवा दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल पुन्हा चर्चेत! कार्यकारिणीची होणार निश्चिती

Goa Cabinet Change: राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय गेले वर्षभर केवळ चर्चेच्या पातळीवर आहे. संतोष यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

B L Santosh Goa Visit

पणजी: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची निश्चिती करण्याच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष येत्या आठवड्यात गोव्यात येणार आहेत. ते यानिमित्ताने सरकारच्या कारभाराचाही आढावा घेतील अशी माहिती मिळाली आहे.

संघटन सचिवपद हे भाजपमध्ये महत्त्वाचे मानले जाते. अनेक निर्णय हे त्यांच्या पातळीवर घेतले जातात. त्यामुळे हे पद महत्त्वाचे मानले जाते. धोरणात्मक निर्णय घेताना या पातळीवर करण्यात आलेले विश्लेषण महत्त्वाचे मानले जाते. राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय गेले वर्षभर केवळ चर्चेच्या पातळीवर आहे. संतोष यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

संतोष या दौऱ्यादरम्यान मंत्री, आमदारांचे म्हणणेही जाणून घेणार आहेत. त्यामुळे सरकारच्या कारभाराविषयी त्यातून निर्माण होणारे आकलन काही निर्णय घेण्यास केंद्रीय नेत्यांना मदतीचे ठरेल असे मानले जात आहे.

प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांची निवड झाली, तरी अद्याप राज्य कार्यकारिणी अस्तित्वात आलेली नाही. राज्य सरचिटणीसपदाच्या दोन जागांवर कोणाची निवड होते याकडेही अनेकांचे लक्ष आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी कोणते नवे चेहरे आणले जातील याविषयीही संघटनेच्या पातळीवर उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT